'कूछ तो रापचीक..' म्हणत रवीने पोस्ट केला 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो | Ravi Jadhav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravi jadhav

'कूछ तो रापचीक..' म्हणत रवीने पोस्ट केला 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो

मराठी चित्रपटसृष्टीला नटरंग आणि टाईमपास सारखे चित्रपट देणारा रवी जाधव हा इंटस्ट्रीतील एक उमदा निर्माता आणि दिग्दर्शक आहे. तो नेहमी चित्रपटांमध्ये नवनवीन प्रयोग करत असतो. रवीने सातत्याने दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्याचे प्रत्येक चित्रपट हे चर्चेत असतात. पण आता रवीने जॅकी श्रॉफसोबत पोस्ट केलेल्या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे.

नुकतंच रवीने फेसबुक अकाऊंटवर बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफसोबतचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं,'हिरो, राम लखन, परींदा, कर्मा, त्रिदेव.. भाड्याने VCR आणि कलर टीव्ही आणून हे चित्रपट अनेक वेळा पाहिले तेव्हा माहित नव्हते एक दिवस या रियल हिरोसोबत काम करायला मिळेल. कुछ तो रापचीक हो रहेला है भीडू. (बाकी तपशील लवकरच),' अशी पोस्ट रवी जाधवने लिहिली आहे. यावरून आता जॅकी हे लवकरच रवीच्या चित्रपटात दिसणार,असा अंदाज बांधला जात आहे.

हेही वाचा: 'जेठालालला' चक्क स्पॅनिश पत्रकाराची कॉमेंट; म्हणाला...

रवीने बालक पालक,न्युड, बालगंर्धव यांसारखे दमदार चित्रपट केले आहेत. तर त्याने कच्चा लिंबू या चित्रपटात त्याने अभिनय केला. जॅकी हे 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी विनोदी कार्यक्रम 'चला हवा येउ द्या'मध्ये आले होते, तेव्हा त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याआधी जॅकी यांनी 'ह्रदयनाथ' या मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे.

loading image
go to top