'पुष्पा'ची क्रेझ रवींद्र जडेजालाही; अल्लू अर्जुनच्या कमेंटने वेधलं लक्ष

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जबरदस्त कमाई
Allu Arjun, Ravindra Jadeja
Allu Arjun, Ravindra JadejaInstagram

'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटाची चांगलीच क्रेझ पहायला मिळतेय. एकीकडे बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या अभिनयाची जोरदार चर्चा आहे. या भूमिकेतून अल्लू अर्जुनने अनेकांना भुरळ पाडली असून त्याला क्रिकेटर रवींद्र जडेजासुद्धा (Ravindra Jadeja) अपवाद ठरला नाही. जडेजाने चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेचं रिक्रिएशन केलं असून सोशल मीडियावर त्याचा फोटो पोस्ट केला आहे.

जडेजाने या फोटोला तेलुगूमध्ये कॅप्शन दिलं आहे. 'पुष्पाचा अर्थ तुम्ही फूल असं समजलात का? इथे त्याचा अर्थ आग असा आहे', असं त्याने म्हटलंय. 'हा फक्त ग्राफिकल फोटो आहे. सिगारेट, बिडी आणि तंबाखूचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. त्याचं सेवन करू नका,' असंही आवाहन जडेजाने केलं आहे. त्याच्या या फोटोवर अल्लू अर्जुनने चित्रपटातील एक डायलॉग पोस्ट केला आहे. Won’t bow down अशी कमेंट त्याने केली असून ही कमेंट सर्वाधिक लाइक केली गेली आहे. जवळपास ३० हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी या कमेंटला लाइक केलंय. चाहत्यांनीही जडेजाच्या या लूकवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 'सुपर', 'किलर बॉय' असे कमेंट्स नेटकऱ्यांनी जडेजाच्या लूकवर केले आहेत.

Allu Arjun, Ravindra Jadeja
'तू करतेय ते चुकीचं की बरोबर..'; अल्लू अर्जुनचं समंथासाठी वक्तव्य

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा’ हा चित्रपट धडाकेबाज ॲक्शन, भन्नाट गाणी, नृत्य, संवाद, अभिनय, संगीत, सिनेमॅटोग्राफी या सर्वच आघाड्यांवर उजवा आहे. ‘पुष्पा’ची कथा आंध्र प्रदेशातील चित्तोर जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरू होते. चित्रपटात पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन हा जंगलातील रक्त चंदनाच्या तस्करांबरोबर हमाल म्हणून काम करणाऱ्या युवकाची भूमिका साकारतोय. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाचीही यामध्ये भूमिका आहे. तर समंथा रुथ प्रभूचा आयटम साँग 'ऊ अंटावा' हा सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com