‘रहना है तेरे दिल में’चा सिक्वल बनणार का? वाचा काय म्हणाला आर माधवन 

Friday, 26 June 2020

माधवनने दीया मिर्झासोबतचा एक जूना फोटो पोस्ट केला आहे.

मुंबई : अभिनेता आर माधवन आणि दीया मिर्झा यांचा गाजलेला चित्रपट ‘रहना है तेरे दिल में’ याचा सिक्वल येणार असल्याची चर्चा करण्यात येत आहे. या चर्चेला चित्रपटाचा अभिनेता आर माधवन यानेच ट्विट करत उत्तर दिले आहे. त्यामुळे चाहत्यांना ‘रहना है तेरे दिल में’ चा सिक्वल लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या चित्रपटाच्या सिक्वलबद्दल माहिती देत असताना माधवनने चांगल्या स्क्रिप्टची अपेक्षा असल्याचे सांगीतले आहे. 

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेने केला मुंबईतील चित्रीकरणाचा श्रीगणेशा

माधवनने दीया मिर्झासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, त्या फोटोसोबतच त्याने लिहीलेल्या कमेंट मध्ये त्याने लिहीले की, “मी रहना है तेरे दिल मे या चित्रपटाच्या सिक्वल बद्दल खूप आफवा ऐकल्या आहेत. मला आशा आहे की त्या खऱ्या असतील कारण मला त्या बद्दल काहीही माहिती नाही. मी प्रार्थना करतोय की कोणाकडे तरी माझ्या आणि दीयाच्या वयाला साजेल अशी स्क्रिप्ट असेल.” त्यापुढे वाढलेल्या वयाकडे इशारा करत माधवनने लिहीले की जर वयाला शोभेल अशी स्क्रिप्ट कोणाकडे नसेल तर चित्रपटाचा सिक्वल हा हत्तीला चड्डी घालण्यासारखं होईल.

 

सुशांतच्या वडिलांनी सांगितलं, ३ वर्ष नवस केल्यानंतर झाला होता सुशांतचा जन्म, शेवटी काय झालं माहित नाही..

19  वर्षांपुर्वी आर माधवन आणि दीया मिर्झा या जोडीचा चित्रपट रहना है तेरे दिल में हा बॉलिवुडमध्ये कमालीचा गाजला होता. 2001 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपटाचे दिग्दर्शक गौतम मेनन होते. तसेच आर माधवन आणि दीया मिर्झा व्यतिरिक्त या चित्रपटात सैफ अली खान याने देखील काम केले होते. entertainment
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read what r madhavan said about sequel of rahna hai tere dil mein