ऐश्वर्या रॉयला आली होती 'छपाक'ची ऑफर, या कारणामुळे दिला नकार

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

'छपाक' साठी आधी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाली होती. जाणून घ्या कोण आहे ती आणि का नाकारली या तिने या चित्रपटाची ऑफर. शिवाय जाणून घ्या 'छपाक' ने पहिल्या दिवशी बॉक्सऑफिसवर किती कोटींची केली कमाई...

मुंबई : सध्या सगळीकडे 'छपाक' वारं वाहतंय. दीपिका पदुकोनचा छपाक नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि महाराष्ट्रात तो करमुक्त (taxfree) करण्यात आला आहे. चित्रपटाची चर्चा गेल्या वर्षभर सुरु होती. त्याच्या पोस्टर आणि ट्रेलर रिलिजनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली. शुक्रवारी (ता. 10) ला तो अखेर रिलिज झाला असून देशभरातून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. पण, 'छपाक' साठी आधी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाली होती. जाणून घ्या कोण आहे ती आणि का नाकारली या तिने या चित्रपटाची ऑफर.

अक्षयने 18 वर्षांनंतर मिळालेला अवॉर्ड दिला आमिरला कारण...

'छपाक' च्या प्रदर्शनापूर्वी अनेक अडचणी आल्या चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणीही करण्यात आली. अखेर सोशल मीडिया आणि कोर्टकडूनही दिलासा मिळवत चित्रपट रिलिज झाला. पण, सिनेमाच्या अनेक अडचणींमध्ये अडकला होता. सिनेमाची स्क्रिप्ट चोरी केल्याचा आरोपही निर्मात्यांवर करण्यात आला होता. जेव्हा सिनेमाचा प्रोमो रिलिज करण्यात आला तेव्हा चित्रपटाची कथा राकेश भारती यांच्या स्क्रिप्टशी मिळती जुळती असल्याचा दावा त्यांनी केला. 

राकेश यांच्यानुसार 2015 मध्ये 'ब्लॅक डे' नावाच्या स्क्रिप्टचे अधिकार त्यांनी असोसिएशनकडे रजिस्टर केले होते. त्यानंतर 2017 मध्ये त्यांना माहिती मिळाली की मेघना गुलजार हा सिनेमा करत आहेत. खरंतर राकेश यांनी चित्रपटासाठी तयारी केली होती. ऐश्वर्या रॉय, कंगणा रणावत, श्रद्धा कपूर, प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा या अभिनेत्रींना राकेश यांनी चित्रपटासाठी विचारणा केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

DolceVita

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

अनुष्का शर्माकडे दोन वर्षे चित्रपटासाठी डेट नव्हती त्यामुळे तिने नकार दिला. प्रियांका चोप्रा भारतात नव्हती आणि चित्रपटासाठी पुरेसा वेळ तिच्याकडे नव्हता. त्यामुळे प्रियांकाने नाही म्हणटले. बॉलिवूडची 'क्वीन' कंगणा रणावतलाही विचारण्यात आले होते. पण, कंगणाची सख्खी बहिण रंगोली चांडेल हिच्यावर अॅसिड हल्ला झाला आहे. कंगणासाठी हा चित्रपट फार इमोशनल ठरु शकतो त्यामुळे तिने नकार दिला. या वयामध्ये श्रद्धाला अशी भूमिका साकारायची नव्हती. तर, विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉयलाही या चित्रपटाची ऑफर आली होती. पण, मोठ्या पडद्यावर तिला कुरुप दिसायचे नव्हते आणि त्यामुळे तिने चित्रपटाला नकार दिला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

'तानाजी'ने बॉक्स ऑफिसवरही फडकावला झेंडा; पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई

'छपाक' ची पहिल्या दिवशी इतकी कमाई
दीपिका पदुकोन आणि विक्रांत मेसी यांचा 'छपाक' 10 तारखेला रिलिज झाला. बहुचर्चित या सिनेमाने बॉक्सऑफिसवर एन्ट्री केली आणि पहिल्या दिवशी 4.77 कोटींचा गल्ला कमावला आहे. चित्रपबट निर्देशकांनी सिनेमाविषयी चांगले रिव्ह्युज दिले आहेत.छपाकची थेट टक्कर झाली ती अजय देवगणच्या 'तान्हाजी' या चित्रपटाशी. पण, तान्हाजीने छपाकपेक्षा जास्त कमाई करत बाजी मारली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reason aishwarya rai rejected the offer of chhapaak movie