...म्हणून इम्रान खान पत्नीपासून राहतोय वेगळा !

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका 'या' कारणाने आता सोबत राहत नाही.

मुंबई : आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इम्रान खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते पर्सनल लाइफमुळे. इम्रान आणि त्याची बायको अवंतिका मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चालू होत्या. त्यांच्यामधील मतभेद वाढल्याने हे कपल घटस्फोट घेणार असल्याच बोललं जात होतं. मात्र या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण त्यांच्या कुटुंबाकडून देण्यात आलं. असं असलं तरी मात्र अवंतिका इम्रानच घर सोडून तिची मुलगी इमारासह माहेरी राहायला गेली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy mother's day, sweetheart... Lots of love.

A post shared by Imran Khan (@imrankhan) on

'पिंकविला' ने दिलेल्या माहितीनुसार इम्रान बराच काळ अभिनेता म्हणून काही खास काम करत नाहीये. त्याने 2015 मध्ये 'कट्टी बट्टी' मध्ये काम केलं पण तो चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर इम्रानने कोणताही चित्रपट केला नाही. त्याच्याकडे कोणत्याही चित्रपटाची ऑफर आली नसल्याचं बोलल जात आहे. गेल्या चार वर्षांपासून त्याने काम केलं नसून तो घरीच होता. त्याने दिग्दर्शनामध्येही काम करण्याचा प्रयत्न केला आणि एका शॉर्ट फिल्मचं शुटिंग केलं. मात्र त्यामध्येही त्याला यश मिळालं नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Repost @avantika_khan #sundayselfie

A post shared by Imran Khan (@imrankhan) on

या सर्व कारणांमुळे इम्रानचा स्वभाव बदलत होता आणि परिणामी तो चिडचिडा झाला. त्याचे सेवींगही संपल्याने अवंतिकाने माहेरीदेखील मदत मागितली. वाढत्या मतभेदांमुळे एकमेकांच्या सहमतीने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. घरातल्या मतभेदांचा परिणाम मुलीवर होऊ नये यासाठी अवंतिकाने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Imran Khan (@imrankhan) on

इम्रान आणि अवंतिका यांची लव्ह लाइफ कोणत्या कथेपेक्षा कमी नाही. मात्र त्यांच्यातील मतभेदामुळे त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this is the reason why Imran Khan not staying with his wife