esakal | अभिनेत्री रेखाचा मुंबईतील बंगला केला सील..
sakal

बोलून बातमी शोधा

rekha

पुन्हा एकदा बॉलीवूड सेलिब्रिटीच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री रेखाचा सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह आला आहे.

अभिनेत्री रेखाचा मुंबईतील बंगला केला सील..

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. सामान्यांप्रमाणेच बॉलीवूड सेलिब्रिटी देखील कोरोनाच्या विळख्यातून सुटू शकलेले नाहीत. अनेक सेलिब्रिटींचे कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आले होते. इतकंच नाही तर संगीतकार वाजीद यांचं निधन देखील कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा बॉलीवूड सेलिब्रिटीच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रेखाचा सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह आला आहे.

हे ही वाचा: सुशांत आत्महत्या प्रकरणात बॉलीवूडच्या तीनही खानवर सुब्रमण्यम स्वामींचा निशाणा, म्हणाले 'यांच्या दुबईतील प्रॉपर्टींची चौकशी करा'

करण जोहर, बोनी कपूर, आमिर खान यांचे कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्यानंतर आता एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाचा एक सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटीव्ह सापडला आहे. यानंतर बीएमसीने रेखाचा मुंबईतील बंगला सील केला आहे. या बंगल्याच्याबाहेर एक नोटीस लावली आहे. या नोटीसमध्ये कंटेनमेंट झोन असा उल्लेख करण्यात आला आहे. रेखाचा हा बंगला मुंबईतील बांद्रा बँडस्टँड या एरिओमध्ये आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रेखाच्या घराच्या बाहेर नेहमी २ सुरक्षारक्षक असतात. यापैकी एकाला काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरस झाल्याचं निदान झालं होतं. मुंबईतील बीकेसी मधील एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. यानंतर बीएमसीने त्या संपूर्ण भागाला सॅनिटाईज केलं आहे. मात्र अजुन रेखा किंवा तिच्या प्रवक्त्यांकडून याबाबत अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. 

गेल्या महिन्यात आमिर खानच्या घरात ७ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली होती. यात आमीरचे दोन बॉडीगार्ड, आणि स्वयंपाकी यांचा समावेश होता. यानंतर आमीरच्या घरातील सर्व सदस्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात सगळ्यांच्या टेस्ट निगेटीव्ह आल्या होत्या. याआधी देखील बोनी कपूर आणि करण जोहर यांच्या कर्मचा-यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. या सगळ्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती. मात्र रेखाकडून अजुन अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.   

rekha bungalow got sealed by bmc staff after security guard found corona positive  

loading image