
कपिलच्या शो मध्ये सहभागी झालेल्या रेखाने रियॅलिटी शो मध्ये सहभागी होण्याविषयी एक टिप्पणी केली आहे. ती सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहे.
मुंबई - टेलिव्हिजन दुनियेत जितके काही रियॅलिटी शो आहेत त्यात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी सहभागी होताना दिसतात. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन तसेच त्या शो चा टीआरपी वाढविण्यासाठी निर्माते सेलिब्रेटींना बोलावतात. यात पब्लिसिटीच्या नावाखाली सहभागी होणा-या कलावंताना छोट्या पडद्यावर पाहायला चाहत्यांना आवडते. मात्र अद्याप असे काही सेलिब्रेटी आहेत त्यांना रियॅलिटी शो चा तिटकारा आहे.
बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री रेखा ही त्यापैकी एक आहे.कपिलच्या शो मध्ये सहभागी झालेल्या रेखाने रियॅलिटी शो मध्ये सहभागी होण्याविषयी एक टिप्पणी केलीय. ती सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. रेखानं त्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून रियॅलिटी शो आणि त्यात सहभागी होणारे स्टार याचे चाहत्यांना फारसं नाविन्य वाटेनासे झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हल्लीच्या प्रत्येक रियॅलिटी शो मध्ये बडे कलावंत आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहभागी होताना दिसतात.
मराठीतही हेच चित्र पाहायला मिळते. त्यानिमित्तानं प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल धमाका अनुभवता येतो असे काही निर्मात्यांचे म्हणणे आहे.
सौंदर्य आणि अभिनय यामुळे आपलं वेगळं स्थान निर्माण करणा-या रेखाजी सोशल मीडियापासून थोड्या लांब आहेत. काही निवडक कार्यक्रमांनाच हजेरी लावणे त्यांना पसंद आहे. अशावेळी रियॅलिटी शो मध्ये त्यांना सहभागी व्हायला आवडेल का, असा प्रश्न कपिलने विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, रियॅलिटी शो मध्ये सहभागी व्हायला मी काही दाखवायची वस्तू आहे का? या शब्दांत त्यांनी उत्तर दिले. लोकांनी मला बघायला यावं यासाठी मला त्या शो मध्ये सहभागी व्हायचं नाहीय. कपिल म्हणाला, तसं असेल तर आम्हा सर्वांना अंदमान-निकोबार बेटांवरच पाठवायला पाहिजे. दोघांच्या या गंमतीशीर संवादाचा व्हिडीओ कपिलने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
'कोणं म्हटलं,वेबसीरीजच्या माध्यमातून संस्कृतीचा अपमान होतो'
रियॅलिटी शो मधून केवळ प्रसिध्दी मिळवणे हाच हेतू नसून सतत चर्चेत राहण्यासाठी अनेकजण या प्लॅटफॉर्मचा उपयोग करत असल्याचे दिसून आले आहे. नव्याने प्रदर्शित होणा-या चित्रपटाची प्रसिध्दी करण्यासाठी एकाच वेळी लाखो प्रेक्षकांपर्यत पोहोचण्याचे सध्या टेलिव्हिजन एक मोठे माध्यम आहे. त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहवयास मिळते.
हे ही वाचा: कोरोना काळातही बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यांनी केली जबरदस्त कमाई