रेखाने कोरोना चाचणी अद्यापही केलेली नाहीच; वाचा काय आहे कारण...

रेखाने कोरोना चाचणी अद्यापही केलेली नाहीच; वाचा काय आहे कारण...


मुंबई ः अभिनेत्री रेखाने कोरोना चाचणी करावी अशी शिफारस महापालिकेने होती. परंतु त्याला रेखाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, रेखाच्या बंगल्यावर रेखा तसेच तिची मँनेजर फरजाना तसेच अन्य चार कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेण्यास महापालिकेचे कर्मचारी गेले असता बंगल्याचा दरवाजा उघडण्यात आला नाही असे समजले आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. अभिनेत्री रेखाच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना होताच रेखाला तसेच बंगल्यातील अन्य मंडळींना होम क्वारंटाईन करण्यात आले. रेखाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आलाआहे. तिचा बंगला तसेच आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला. रेखा तसेच रेखाच्या घरातील चार कर्मचारी व मॅनेजर फरजादा यांची कोरोना चाचणी घेण्यास पालिकेचे अधिकारी गेले असता त्यांना तेथून परत यावे लागले आहे.

फरजादाने आपला मोबाईल क्रमांक दिला आणि नंतर बोलू असे सांगितले. त्यामुळे पालिकेच्या अधिकारी तेथून परत आले. नंतर त्या नंबरवर फोन केला असता रेखाची तब्येत उत्तम आहे, असे सांगण्यात आले. मात्र या वृत्तास कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. महापालिकेचे एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते म्हणाले, की रेखा यांना आवश्यक वाटल्यास कोवीडची चाचणी करण्याची शिफारस केलेली आहे. याचा अर्थ रेखाने अजूनही कोरोना चाचणी केली नाही.

तसेच आजूबाजूच्या बंगल्यातील सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. कारण हे सुरक्षा रक्षक आणि रेखाचा सुरक्षा रक्षक एकमेकांना भेटत होते. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता चार सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com