Chitra Wagh Trolled
Chitra Wagh Trolledesakal

Chitra Wagh Trolled : 'वाघ ताई आपला बाण..' उर्फीवरुन नेटकऱ्यांनी घेतली चित्रा वाघ यांची शाळा

टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या उर्फीला भाजपच्या चित्रा वाघ यांनी सज्जड दम भरला.
Published on

Urfi Javed actress Chitra Wagh BJP Leader now : टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या उर्फीला भाजपच्या चित्रा वाघ यांनी सज्जड दम भरला. भाजपच्या महिल्या पदाधिकाऱ्यांनी तर थेट उर्फीच्या घरावरच मोर्चा नेला. काही करुन उर्फीनं माफी मागावी, तिनं यापुढे कपड्यांबाबत शिस्त पाळावी. असे त्यांचे म्हणणे होते.

यासगळ्यात उर्फीनं चित्रा वाघ यांना जशास तसे उत्तर दिले आहे. उर्फीनं तिची असभ्यपणा सोडला नाहीतर तिचं थोबाड रंगवल्याशिवाय राहणार नाही. असा आक्रमक पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला आहे. यावर उर्फीनं तर चित्रा वाघ यांची राजकीय कुंडलीच बाहेर काढली आहे. उर्फीचं ते ट्विट आता नेटकऱ्यांचे आणि तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

उर्फीनं थेट शिंदे गटाच्या संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. राठोड महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते त्यावेळी तुम्ही त्यांच्याविरोधात टीका केली होती. आता ते भाजपच्या साथीनं मंत्री झाले तेव्हा मात्र ते तुमचे खास मित्र झाले आहेत. हे ट्विट वाचताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांना ट्रोल केले आहे.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

अनेकांनी उर्फीची बाजू घेत चित्रा वाघ यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. एकानं लिहिलं आहे की, उर्फीनं चित्रा वाघ यांना बरोबर कोंडीत पकडले आहे. दुसऱ्यानं चित्रा ताई आपलाच बाण आपल्यावरच उलटला की काय या शब्दांत टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फी विरुद्ध चित्रा वाघ अशी लढाई सुरु झाली असून त्यात नेटकऱ्यांचे मात्र मनोरंजन होताना दिसत आहे.

Chitra Wagh Trolled
Urfi Javed Tweet: 'चित्राजी संजय आठवतो का?' उर्फीनं चित्रा वाघ यांची कुंडलीच काढली

उर्फीनं चित्रा वाघ यांच्याबाबत बराचसा रिसर्च केलेला दिसतो आहे. म्हणून तर तिनं चित्रा वाघ यांना बरोबर कोंडीत पकडले आहे. अशा प्रतिक्रिया उर्फीच्या टिव्टवर आल्या आहेत. विशेषत: बॉलीवूडचे चित्रपट त्यातील संवाद यांचा आधार घेत या वादावर भन्नाट प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Chitra Wagh Trolled
Urfi Javed: राजकीय नेत्यांनाच नाही तर या सेलिब्रिटींनाही उर्फीनं दिलाय दणका..

उर्फीनं चित्रा वाघ यांना आव्हान दिलं. चित्रा वाघ यांनी त्यांची संपत्ती उघड केल्यास जेलमध्ये जाण्यास तयार आहे. असे तिनं म्हटले आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून उर्फीनं चित्रा वाघ यांच्यावर टीकेचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com