
सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा असं कायमच म्हटलं जातं. आपल्या आरस्पानी सौंदर्य आणि अभिनयामुळे रेखा यांनी अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे आजही त्यांचा अफाट मोठा चाहतावर्ग पाहायला मिळतो. सोशल मीडियावर फारशा सक्रीय नसलेल्या रेखाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. त्यामुळे त्या कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या की त्यांच्याविषयीच्या चर्चांना उधाण येतं. सध्या सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अशीच एक चर्चा रंगली आहे. इंडियन आयडॉल १२ या रिअॅलिटी शोमधील पवनदीप या स्पर्धकाला रेखा यांनी दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच रेखा यांनी इंडियन आयडॉल १२ च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी शोमधील स्पर्धकांनी रेखा यांच्या चित्रपटातील काही गाणी सादर केली. त्यातच उत्तराखंडमधील पवनदीप याने देखा एक ख्वाब आणि हमें और जीने की ही दोन गाणी सादर केली विशेष म्हणजे पवनदीपची ही गाणी ऐकून रेखा भारावून गेल्या आणि त्यांनी पवनदीपला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. इतकंच नाही तर त्यांनी पवनदीपसोबत ढोलकीवरदेखील थाप दिली.
"तुझ्या आवाजात एक जादू आहे. मला खरंच तुला दत्तक घेण्याची इच्छा होतीये. देवाची कृपा अशीच सैदव तुझ्या पाठीशी राहो", असं रेखा म्हणाल्या.
दरम्यान,रेखा आणि पवनदीप या दोघांनीही मिळून इंडियन आयडॉलच्या मंचावर ढोलकी वाजवली आणि उपस्थित साऱ्यांनाच आश्चर्यचकित केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.