esakal | दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या "शक्ती" या चित्रपटाचा रिमेक
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या "शक्ती" या चित्रपटाचा रिमेक

1982 साली रिलीज झालेला दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा "शक्ती" हा चित्रपट खूप गाजला. आता 38 वर्षानंतर "शक्ती" या चित्रपटाचा रिमेक बनणार आहे.

दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या "शक्ती" या चित्रपटाचा रिमेक

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


मुंबई ः 1982 साली रिलीज झालेला दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा "शक्ती" हा चित्रपट खूप गाजला. आता 38 वर्षानंतर "शक्ती" या चित्रपटाचा रिमेक बनणार आहे. रमेश सिप्पीच्या या अ‍ॅक्शन आणि गुन्हेगारी चित्रपटाच्या रिमेकची योजना यापूर्वीही तयार केली जात होती. वडील म्हणून अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी बंडखोर मुलाची भूमिका स्वीकारली होती; परंतु तो चित्रपट पुढे जाऊ शकला नाही. आता नारायण सिंह या आयकॉनिक चित्रपटाच्या रिमेकवर काम करत आहेत.  

पंडित जसराज यांचे पार्थिव अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

या चित्रपटाबद्दल निर्मात्यांनी सांगितले की, “मी, अंजुम राजाबाली आणि सौम्य जोशी गेल्या दोन वर्षांपासून स्क्रीप्टवर काम करत आहोत. हा चित्रपट तयार करणे ही एक मोठी जबाबदारी आहे, म्हणूनच आम्ही स्क्रिप्टला अंतिम रूप देण्यास वेळ घेत आहोत. आम्ही या चित्रपटाचे रिमेकपेक्षा रुपांतर अधिक करणार आहोत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस आहे."  ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार आणि महानायक अमिताभ बच्चन शक्ती या एकमेव चित्रपटासाठी एकत्र आले आणि त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात पाहायला मिळाली. या कलाकारांबरोबरच या चित्रपटात अमरीश पुरी, स्मिता पाटील आणि कुलभूषण खरबंदा यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. 

---------------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top