"उरी'चा साऊथ रिमेक 

uri
uri

विकी कौशलचा "उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटाने आतापर्यंत 90 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. बॉक्‍स ऑफिसवर अजूनही याची घोडदौड सुरूच आहे. अशातच आता या चित्रपटाबाबत आणखी एक खुशखबर समोर आली आहे.

तमीळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतही हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. "उरी'चा साऊथमध्ये रिमेक बनवणार असल्याचं घोषित केलं आहे. साऊथ रिमेकसाठी या चित्रपटाचे अधिकृत राईट्‌सही विकत घेण्यात आले आहेत. रोनी स्क्रुवाला निर्मित आणि आदित्य धार दिग्दर्शित "उरी' चित्रपट विकीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

सर्जिकल स्ट्राईकवर आधारित या चित्रपटात यामी गौतम आणि परेश रावल यांनीही उत्तम अभिनय करत समीक्षकांकडून वाहवा मिळवली. आता या चित्रपटाचा साऊथ रिमेक नेमका कसा असणार?, शिवाय कोणते कलाकार यामध्ये काम करताना दिसणार? हे काही दिवसांत स्पष्ट होईलच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com