esakal | रियाने AU ला केलेत तब्बल ६३ फोन, रियाच्या काँटॅक्ट्स मधील AU म्हणजे...
sakal

बोलून बातमी शोधा

रियाने AU ला केलेत तब्बल ६३ फोन, रियाच्या काँटॅक्ट्स मधील AU म्हणजे...

सुशांत सिंह राजपूत प्रकरण आता आणखी क्लिष्ट होत चाललंय. एकीकडे मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलिस असा वाद सुरु आहे.

रियाने AU ला केलेत तब्बल ६३ फोन, रियाच्या काँटॅक्ट्स मधील AU म्हणजे...

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरण आता आणखी क्लिष्ट होत चाललंय. एकीकडे मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलिस असा वाद सुरु आहे. बरं आता तपास मुंबई पोलिसांकडे राहणार की केंद्रीय तपास पथकाकडून या प्रकरणात तपास होणार हे आता सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे. दरम्यान सक्तवसुली संचालनालय देखील यामध्ये तपासणी करतंय. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय. रियाने तिच्या वाषिर्क आयटी रिटर्नच्या तुलनेत किती, कुठे आणि कशी संपत्ती घेतली. सुशांतच्या खात्यातील रक्कम कुठे वापरली गेली. रियाच्या संपत्तीमध्ये वाढ कशी झाली ? याबाबत ED तपास करतंय हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. 

मोठी बातमी सुशांतच्या परिवाराने दिलेल्या अल्टिमेटमवर संजय राऊतांचं 'मोठं वक्तव्य, म्हणालेत...

मात्र आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येतेय. या प्रकरणात आता तपास यंत्रणांकडून सर्वांचे कॉल डिटेल्स चेक केले जातायत. रिचयाचेही सर्व कॉल डिटेल्स चेक केले गेलेत. यामध्ये रिया चक्रवर्तीने तिच्या मोबाईलमध्ये AU नावाने सेव्ह असलेल्या व्यक्तीला फोन केल्याचं आढळून आलंय. दरम्यान रिलायने या AU नावाने सेव्ह केलेल्या नंबरवर ६३ वेळा संपर्क केलाय. इंग्रजी वृत्तसमूह टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत माहिती प्रकाशित केलीये. त्यात त्यांनी AU ही रियाच्या अत्यंत जवळची व्यक्ती असल्याचं म्हटलंय. 

मोठी बातमी : वाढीव वीज बिलांबाबत आज 'मोठा' निर्णय होण्याची शक्यता, वीज बिल होणार माफ ?

  • रियाने AU या नावाने सेव्ह असलेल्या व्यक्तीला तब्बल ६३ वेळा फोन केलाय 
  • टीम रियाचं म्हणणं आहे की AU रियाची जवळची मैत्रीण आहे 
  • AU म्हणजे अनन्या उधास, जी की रियाची फॅमिली फ्रेंड असल्याचं समजतंय

रियाने कुणाला केलेत फोन कॉल्स 

रियाच्या कॉल डिटेल्सवरून रियाने आपल्या वडिलांना वर्षभरात सर्वाधिक म्हणजेच  १ हजार १९२ वेळा फोन केलेत. तिने आईलाही वर्षभरात ५३७ वेळा फोन केला होता. रियाच्या फोन रेकॉर्ड वरून तिने महेश भट्ट यांनाही फोन कॉल केले होते हे आता स्पष्ट झालंय. 

rhea called AU for sixty three times call records reviled who is AU