Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीच्या विरोधात CBI कडून 'लूक आऊट' नोटीस! काय आहे कारण?

बॉलीवूडची अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात आता सीबीआयकडून लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे.
Rhea Chakraborty late Sushant Singh Rajput
Rhea Chakraborty late Sushant Singh Rajputesakal

Rhea Chakraborty Bollywood Actress High Court : बॉलीवूडची अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात आता सीबीआयकडून लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणासंबंधी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी रियाची सीबीआयच्या वतीनं कसून चौकशीही करण्यात आली आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात जेव्हा रियाची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं तिनं धाव घेतली होती. त्याचवेळी तिनं सीबीआयनं तिच्याविरोधात जे निर्देश देण्यात आले होते ते रद्द करण्याची मागणी रियानं केली आहे. त्यावर कोर्टानं दुसरी तारीख दिली आहे.

रियाला सीबीआयकडून ते लूकआऊट सर्क्युलर काढण्यात आले आहे त्याला उच्च न्यायालयात तिनं आव्हान दिलं आहे. १४ जुन २०२० रोजी बांद्रा येथे सुशांतचा मृत्यू झाला होता. त्यानं आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली होती. त्याच्या या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यातून कित्येक बॉलीवूड सेलिब्रेटींची नावं समोर आली होती. त्यानंतर पुन्हा रियाचं नाव चर्चेत आली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या नातेवाईकांनी सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात बिहार पोलिसांकडे तक्रार देखील केली होती. रियानं तिच्या याचिकेतून ती नोटीस करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्याचे कारण रियाला काही कामानिमित्तानं विदेशात जायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com