रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यत वाढ

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 6 October 2020

सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी अमली पदार्थांचा संबंध उघड झाल्याने एनसीबीकडून तपासाला  सुरूवात झाली.  दरम्यान चार अभिनेत्रींसह १८ जणांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र यापुढील काळात रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता असल्याची चर्चा आहे,  

मुंबई: अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्याने तिची डोकेदुखीत आणखी भर पडली आहे. याबरोबरच रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती तसंच आरोपी सॅम्युएल मिरांडा, दिपेश सावंत, झैल विलात्रा, अब्देल बसित परिहार, ड्वेन फर्नांडिस यांच्या न्यायालयीन कोठडीतही 14 दिवस  (20 ऑक्टोबरपर्यंत)  वाढ करण्यात आली आहे.

अमली पदार्थांबाबत कुठलाही अभिनेता नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) रडारवर नाही. यामुळंच अटकेतील आरोपींच्या रिमांड अर्जात देखील कुठल्याही अभिनेत्याचं नाव नाही. त्यावरून आरोपीचा छळ करण्यात आलेला नाही हे सिद्ध होतं, असं एनसीबीनं स्पष्ट केलं आहे.

अजय देवगणचा भाऊ अनिल देवगण यांचे निधन

रियानं सुशांतच्या बहिणींवरही गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केला होता. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार दिला असून सुशांतला त्याच्या या बहिणींनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषधे दिली, असा आरोप करत अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. तो रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी रिट याचिका दोघींनी केली आहे. याबाबत सध्या पोलिसांचा तपास सुरू असल्याने आम्ही त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही. त्यामुळे या टप्प्यावर तातडीने सुनावणी घेण्याचे कारण दिसत नाही', असं नमूद करून तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाने नकार दिला.

झारखंडमधल्या 50 मुलींना सोनु सुद देणार नोकरी

सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी अमली पदार्थांचा संबंध उघड झाल्याने एनसीबीकडून तपासाला  सुरूवात झाली.  दरम्यान चार अभिनेत्रींसह १८ जणांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र यापुढील काळात रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता असल्याची चर्चा आहे,  न्यायालयीन कोठडीत विशेष एनडीपीएस न्यायालयानं आणखी १४ दिवसांची वाढ केली आहे. 

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rhea Chakraborty Judicial Custody Extended Till October 20