esakal | रिया चक्रवर्तीच्या लीगल टीमचा नवीन जबाब, सुशांतच्या बहिणीवर केले आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

rhea legal team

सुशांतचे वडिल केके सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबामध्ये असा दावा केला आहे की सुशांत सिंह राजपूतच्या अकाऊंटमधून अवैधरित्या १५ कोटी रुपये काढले गेले आहेत. आता यावर रिया चक्रवर्तीचा अधिकृत जबाब देखील समोर आला आहे. 

रिया चक्रवर्तीच्या लीगल टीमचा नवीन जबाब, सुशांतच्या बहिणीवर केले आरोप

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. दुसरीकडे या प्रकरणात ईडी देखील चौकशी करत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेले कित्येक दिवस चौकशी सुरु आहे, सुशांतचे वडिल केके सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबामध्ये असा दावा केला आहे की सुशांत सिंह राजपूतच्या अकाऊंटमधून अवैधरित्या १५ कोटी रुपये काढले गेले आहेत. आता यावर रिया चक्रवर्तीचा अधिकृत जबाब देखील समोर आला आहे. 

हे ही वाचा: पेट्रोल पंपवर काम करत कविता करणा-या गुलजार यांना अशी मिळाली होती पहिली संधी

रियाच्या लीगल टीमने जबाब सादर करत त्यांची बाजू मांडली आहे. या जबाबात म्हटल्याप्रमाणे रिया आणि सुशांत गेले कित्येक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. या दिवसात दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि दोघे एकमेकांशी चांगले बोलायला लागले. एप्रिल २०१९ मध्ये रिया आणि सुशांत एका पार्टीत भेटले होते. यानंतर लगेचच ते एकमेकांना डेट करायला लागले.

जबाबात रियाच्या लीगल टीमने काय म्हटलंय वाचा:

१. रिया नाही आदीत्य ठाकरे यांना ओळखत आणि नाही आदीत्यला कधी भेटली आहे.

२. रियाच्या गप्प बसण्याला तिची कमजोरी समजू नका. सुशांतचं कुटुंब सुशिक्षित आहे आणि त्यांच्या कुटुंबात एक आयपीएस अधिकारी  ओपी सिंह देखील आहेत. त्यांनी पूर्णपणे त्यांच्या मनाच्या आणि चुकीच्या उद्देश्यांसाठी आरोप केले आहेत. 

३. बिहार पोलिसांनी दाखल केलेली एफआयर पूर्णपणे राजकारणाशी संबंधित आहे. रिया चुकीच्या तपासाचा भाग होऊ शकत नाही. 

४. रिया ईडीच्या तपासात पूर्णपणे सहकार्य करत आहे. मुंबई पोलिस आणि ईडी यांना रियाची सगळे कागदपत्र दिली आहेत जी स्पष्टपणे या आरोपांना चूकीचं सिद्ध करत आहेत. 

५.  रियाच्या खात्यांसह आयकर रिटर्नची तपासणी ईडीने केली आहे. आत्तापर्यंत तिच्याविरोधात  एकही पुरावा मिळाला नाही.

६. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाने एकही रुपया ट्रांसफर केलेला नाही. तिच्या सगळ्या आयकर रिटर्नची तपासणी पोलिसांसोबत ईडीनेही केली आहे.

७. सुशांतच्या बहिणीने डिसेंबर १९ मध्ये रियासोबत छेडछाड केली होती. म्हणून हे आरोप मनात किलमिश ठेवून केले गेले आहेत.

या जबाबात हे देखील सांगितलं आहे रियाला सीबीआय तपासणीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये.    

rhea chakraborty statement revealing details of sushant singh rajput death case  

loading image