Richa Chadha And Ali Fazal: अली म्हणतो, 1+1=3, रिचा चड्ढानं दिली गुडन्यूज; शेअर केली खास पोस्ट

Richa Chadha And Ali Fazal:सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी अली आणि रिचा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Richa Chadha And Ali Fazal
Richa Chadha And Ali Fazal

Richa Chadha And Ali Fazal: अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अभिनेता अली फजल (Ali Fazal) यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. रिचा आणि अली हे आई-बाबा होणार आहेत. दोघांनी खास पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी अली आणि रिचा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अली आणि रिचानं शेअर केली पोस्ट

अली आणि रिचा यांनी नुकतेच दोन खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील एका फोटोमध्ये "वन+वन= थ्री", असं लिहिलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये रिचा आणि अलीचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. रिचा आणि अली यांनी या फोटोंना कॅप्शन दिलं, "चिमुकल्याच्या हृदयाचा ठोका हा जगातील सर्वात मोठा आवाज आहे " रिचा आणि अली यांनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अली आणि रिचावर शुभेच्छांचा वर्षाव

नेटकऱ्यांनी अली आणि रिचा यांच्या फोटोवर कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "दोघांचेही अभिनंदन" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "गुड्डू भैय्या आता बाबा होणार"

रिचा आणि अली यांनी फुकरे या चित्रपटात काम केलं. त्यांनी 2022 मध्ये लग्न केले. रिचा आणि अली यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रिचा आणि अली यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com