रिचा म्हणते जिंकली, पायल म्हणे निकाल आहे बाकी ; अनुराग कश्यप मानहानी प्रकरण  

richa chadha shares court order copy stating payal ghosh will unconditional apology
richa chadha shares court order copy stating payal ghosh will unconditional apology

मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणा-या पायलने या प्रकरणात अभिनेत्री रिचा चढ्ढाचेही नाव घेतले होते. यामुळे संतापलेल्या रिचाने पायलच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. रिचाने या केसच्या संदर्भात जो निकाल पुढे आला त्याची माहिती सोशल मीडियातून प्रसिध्द केली आहे. त्यात तिने 'आमचा विजय झाला आहे, सत्यमेव जयते' असे पोस्ट केले आहे. याप्रकरणावर पुढील सुनावणी बारा ऑक्टोबरला होणार आहे.

न्यायालयाकडून देण्यात आलेला निकाल हा सरकारी अभिलेखावर उपलब्ध आहे. याशिवाय मुंबई उच्च न्य़ायालयाच्या वेबसाईटवरही हा निकाल पाहता येईल असे रिचाने आपल्या प्रसिध्द केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून रिचा आणि पायल यांच्य़ातील वाद समोर आला आहे. पायल घोष हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आणि अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यात तिने अभिनेत्री रिचा चढ्ढा हिचे नाव घेतल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. यानंतर रिचाने पायलच्या विरोधात मानहानीची केस दाखल केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यासगळ्या वादावर पडदा टाकण्यासाठी पायलने रिचाची माफी मागितली आहे. मात्र कोर्टाच्या बाहेर आल्यावर तिने आपण असे काही करणार असल्याचे अमान्य केले. 

पायलनेही एक ट्वीट केले आहे. त्यात ती म्हणते, न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असताना रिचा त्यावर आपला विजय झाल्याचे कसे म्हणते, ती असा दावा का करत आहे, येत्या बारा ऑक्टोबरला न्यायालय जो निकाल देईल त्याचा मी स्वीकार करणार आहे. यासगळ्या प्रकरणात खरे कोण हे कळेलच. मात्र सध्या या दोघींच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माझी लढाई ही रिचा बरोबर नसून ही अनुराग बरोबर आहे. यात रिचाचा काही संबंध नाही. आपण रिचाची माफी मागायला तयार आहोत असे बुधवारी पायलने उच्च न्यायालयाला सांगितले होते. आम्ही तिचा माफीनामा स्वीकार करत असल्याचे रिचाच्या वकीलांनी सांगितले. मात्र कोर्टाच्या बाहेर आल्यावर पायलने रिचाची माफी मागण्यास नकार दिला.

२०१३ मध्ये पायलनं अनुरागनं आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. मात्र या काळात अनुराग एका कामासाठी महिनाभर श्रीलंकेत होता. यासंदर्भातील कागदपत्रे देखील पुरावे म्हणून उपलब्ध असल्याचं अनुरागच्या वकिलांनी म्हटलं आहे. लैंगिक शोषण करण्याच्या आरोपावरुन अनुराग कश्यपची वर्सोवा पोलिसांनी आठ तास चौकशी केली. अभिनेत्री पायल घोष हिच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अनुरागला देण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com