esakal | मुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेते चीनशी पंगा घेणार; वाचा नेमकं काय करणार ते...
sakal

बोलून बातमी शोधा

china wear

कोरोनाचा जगात वाढणारा प्रभाव, त्यातच चीनविरुद्ध सीमेवर संघर्ष सुरू झाल्यामुळे चीनविरोध तीव्र होत आहे. त्यात चीनच्या कंपन्यांना विरोध करण्याची मागणी जास्तच जोर धरत आहे.

मुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेते चीनशी पंगा घेणार; वाचा नेमकं काय करणार ते...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा जगात वाढणारा प्रभाव, त्यातच चीनविरुद्ध सीमेवर संघर्ष सुरू झाल्यामुळे चीनविरोध तीव्र होत आहे. त्यात चीनच्या कंपन्यांना विरोध करण्याची मागणी जास्तच जोर धरत आहे. क्रीडा साहित्यातही चीनमधील कंपन्यांची मक्तेदारी वाढत आहे; मात्र चीनमध्ये तयार झालेले क्रीडा साहित्य आम्ही विक्रीस ठेवणार नाही, असे मुंबईतील क्रीडा साहित्य विक्रेत्यांनी यापूर्वीच ठरवले आहे, याकडे मनोहर वागळे यांनी लक्ष वेधले. 

आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली! खासगी रुग्णालयांची लुटमार सुरूच

मनोहर वागळे हे वागळे अँड कंपनी या देशातील पहिल्या क्रीडा साहित्य दुकानाचे मालक आहेत; तसेच ते मुंबईतील क्रीडा साहित्य विक्री संघटनेचे अध्यक्ष आहेत. क्रीडा साहित्यात अनेक कंपन्या परदेशी आहेत. सर्वच कंपन्या चीनच्या नाहीत; पण त्यातील अनेक कंपन्या क्रीडा साहित्याची निर्मिती चीनमधून करून घेत आहेत, याकडे वागळे यांनी लक्ष वेधले. आम्ही चीनमध्ये बनवलेला माल ठेवणार नाही. आम्ही सर्व दुकानदारांनी ठरवले आहे. चीनमध्ये बनवलेला माल नको, तो बंद करा. आम्ही घेणार नाही, असे आम्ही भारतातील कंपन्यांना कळवले आहे, असे वागळे यांनी सांगितले. वागळे अध्यक्ष असलेल्या संघटनेचे 180 दुकानदार सदस्य आहेत. 

अरे बापरे..! राज्यात कोरोनाचा धोका वाढणार ? गुजरात, राजस्थानातून महाराष्ट्रात अवैध प्रवासी वाहतूक...

आता सध्या काही गोष्टींना पर्याय नाही. योगा मॅट चीनहून येतात, त्याला पर्याय नाही. ते कदाचित बंद करता येणार नाही, त्याला पर्याय नाही. त्याची मागणीही जास्त आहे. आम्ही काही ते नाकारू शकत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिल्लीतील क्रीडा साहित्य विक्रेते तसेच क्रीडा साहित्यावरील जीएसटी कमी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या गुरचरण सिंग यांनी फिटनेस साहित्याच्या निर्मितीत चिनी कंपन्या आघाडीवर आहेत. ट्रेड मिल, कार्डिओ, विविध साहित्यातील तांत्रिक ज्ञान आपल्याकडे नाही. ते पूर्ण भारतात येण्यास पाच ते दहा वर्षे लागतील, असे त्यांनी सांगितले. 

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : सुशांतसोबतचे कॉन्ट्रॅक्ट यश राज फिल्म्सने पोलिसांकडे केले सुपूर्त...

क्रीडा साहित्यातील चिनी आव्हान 

  • क्रिकेट तसेच हॉकीतील भारतातील साहित्याचा वापर 
  • भारतात परदेशातून येणाऱ्या फुटबॉलची तैवान, चीनमध्ये प्रामुख्याने निर्मिती 
  • बॅडमिंटन लीग निंग आघाडीचे उत्पादक, हौशी खेळाडूंसाठी बॅडमिंटनची रॅकेटची निर्मितीही चीनमधून 
  • फिटनेसचे सामान चीनमधून, कंपन्या भारतीय असल्या तरी निर्मिती चीनमध्ये 
  • टेनिसचे साहित्य अमेरिकन कंपन्या; पण त्या साहित्य चीनमधून बनवून घेतात 
  • स्क्वाशचे साहित्य अमेरिकन कंपन्या; पण त्याची निर्मिती चीनमध्ये, अथवा चीन आणि तैवानमधून 
  • बॉक्‍सिंगच्या साहित्याची अद्याप चीनची निर्मिती नाही 
  • बास्केटबॉलच्या निर्मितीत चीनमधील कंपन्या 
  • तिरंदाजी तसेच नेमबाजीत चिनी कंपन्या नाहीत 
  • स्पोर्टस्‌ शूजमध्येही चीनमधील कंपन्या नाहीत.
loading image