'व्हिलेज रॉकस्टार्स' भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत

वृत्तसंस्था
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा आसामी चित्रपट भारताकडून परदेशी चित्रपट विभागातून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने आज जाहीर केले आहे की 'व्हिलेज रॉकस्टार' चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागात भारताचे प्रतिनिधीत्व करेल.

मुंबई- रिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'व्हिलेज रॉकस्टार्स' हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे. परंतु, रिमा दास यांचा आसामी चित्रपट भारताकडून परदेशी चित्रपट विभागातून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने आज जाहीर केले आहे की 'व्हिलेज रॉकस्टार' चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागात भारताचे प्रतिनिधीत्व करेल.

एकूण 12 सदस्यांच्या ज्यूरींनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. 'व्हिलेज रॉकस्टार्स' चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. त्या मुलीला गिटारिस्ट बनायचे असते. दहा वर्षाच्या या मुलीला संगीत क्षेत्रातून जगभरात आपले नाव बनवायचे असते. हा चित्रपट 28 सप्टेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे. तब्बल 29 वर्षांनंतर एखाद्या आसामी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.

त्याचबरोबर, भारतीय सिनेमामध्ये आणखी दोन चित्रपट यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामध्ये संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा चित्रपट आहे ज्यामध्ये दीपिका पदुकोन, रणवीर सिंह आणि शहीद कपूर यांच्या मुख्य भुमिका आहेत. तर राजकुमार हिराणी यांचा संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला 'संजू' हा चित्रपट आहे, ज्यामध्ये रणबीर कपूरने संजय दत्तची भुमिका साकारली आहे. तसेच, या चित्रपटात परेश रावल आणि अनुष्का शर्मा यांच्याही भुमिका आहेत.

त्याचबरोर, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंदा सोनवाल यांनी रिमा दास आणि या चित्रपटाचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. अभिनंदन ! रिमा दास, व्हिलेज रॉकस्टार्स अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

Web Title: Rima Das on her Oscar nomination for Village Rockstars