रिंकू राजगुरु लढेल निवडणूक; 'कागर'चा टीझर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

'कागर'चा टीझर पाहिल्यानंतर रिंकूने भूमिका जरी बदलली असली तरी तिच्या बोलणीतील बाज कायम दिसेल.

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु ही बऱ्याच काळापासून चित्रपट पडद्यापासून दूर होती. ती एका नव्या चित्रपटाच्या शूटींग मध्ये व्यस्त असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी रिंकू एका नवीन लूक मध्ये आपल्याला दिसली होती. निळ्या रंगाची कॉटन साडी परिधान करुन चेहऱ्यावर गंभीर भाव असलेले रिंकूचे पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता हे पोस्टर असलेल्या 'कागर' चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे.

'सैराट'मुळे गाजलेली आर्ची आणि तिचा बोलण्याचा बाज प्रेक्षकांना खूप भावला. 'कागर'चा टीझर पाहिल्यानंतर रिंकूने भूमिका जरी बदलली असली तरी तिच्या बोलणीतील बाज कायम दिसेल. चित्रपटात प्रेम कथा आहे. पण राजकारणाचा विषय हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kagar promotion

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

'कागर'मध्ये रिंकू वेगळ्या अंदाजात दिसत आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अकलूज येथे करण्यात आले आहे. येत्या 26 एप्रिलला 'कागर' प्रदर्शित होणार आहे.


 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rinku Rajguru starrer Kagar marathi film Teaser release