Rinku Rajguru: पायी प्रवास, गरम मॅगी, निसर्ग आणि बरंच काही... रिंकूच्या केदारनाथ यात्रेचा व्हिडीओ बघाच

रिंकू राजगुरुने सोशल मिडीयावर एक खास पोस्ट शेअर केलीय केदारनाथ यात्रेचा व्हिडीओ शेअर केलाय
rinku rajguru video of kedarnath yatra journey marathi actress sairat
rinku rajguru video of kedarnath yatra journey marathi actress sairatSAKAL

Rinku Rajguru Kedarnath Yatra News: रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. रिंकूला आपण आजवर अनेक सिनेमा, वेबसिरीजमध्ये अभिनय करताना पाहिलंय.

रिंकूने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत रिंकूने जी केदारनाथ यात्रा केली त्याचा व्हिडीओ दिसून येतोय.

rinku rajguru video of kedarnath yatra journey marathi actress sairat
Shyamchi Aai: दिवाळीत भेटायला येणार श्यामची आई! मुळशी पॅटर्न मधील हा कलाकार साकारणार प्रमुख भुमिका

रिंकूचा केदारनाथ यात्रेचा व्हिडीओ

रिंकू राजगुरुने केदारनाथ यात्रेचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत रिंकू सुरुवातीला एअरपोर्टवर मजा - मस्ती करताना दिसतेय.

पुढे व्हिडीओत ती गरमागरम पराठा आणि मॅगीचा आस्वाद घेताना दिसतेय. केदारनाथ साठी काठीचा आधार घेत ती पायी चालताना दिसतेय. मध्येच थांबून ती निसर्गाचा आस्वाद घेताना दिसतेय. रिंकूचा केदारनाथ यात्रेचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

रिंकूच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती

रिंकूच्या केदारनाथ यात्रेच्या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. रिंकू तिच्या मैत्रिणींसोबत केदारनाथला गेली होती.

रिंकूच्या मैत्रिणींनी कमेंट करुन या अविस्मरणीय ट्रीपसाठी तिचे आभार मानले आहेत. याशिवाय अनेक चाहत्यांनी केदारनाथ यात्रेबद्दल कमेंट करुन या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

रिंकू राजगुरु वर्कफ्रंट

रिंकू राजगुरुच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती आगामी खिल्लार या मराठी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच अभिनेता ललित प्रभाकर सोबत काम करणार आहे. मकरंद माने या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमाची घोषणा काही महिन्यांपूर्वी झाली. हा सिनेमा पुढील वर्षी २०२४ ला भेटीला येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com