Raha Kapoor : ऋषी कपूर यांच्यासोबत नातीचा फोटो पाहून आजी नीतू भावूक! काय आहे 'त्या' फोटोमागील सत्य?

रणबीर आणि आलियाच्या लाडक्या लेकीच्या त्या फोटोंवर आता चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत.
Rishi Kapoor And Raha Kapoor Photo
Rishi Kapoor And Raha Kapoor Photo

Rishi Kapoor And Raha Kapoor Photo - रणबीर कपूर- आलिया भट्टची मुलगी राहा कपूरचा काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर चाहत्यांनी त्या फोटोवरुन वेगवेगळ्या कमेंटस करुन राहावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यानंतर आता एका फोटोनं वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

आलिया अन् रणबीर यांनी गेल्या वर्षी राहाचा फोटो शेयर करुन चाहत्यांना वेगळं गिफ्ट दिलं होतं.तो फोटो पाहून अनेकांनी राहा आणि अभिनेते ऋषी कपूर यांची तुलना केली होती. आजोबांसारखा चेहरा असे म्हणून काही पोस्टही शेयर झाल्या होत्या. त्यात आता पुन्हा एका फोटोची भर पडली आहे. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

२०२२ हे वर्षं रणबीर आणि आलियासाठी चांगलेच लाभदायी ठरल्याचे दिसून आले. या वर्षी त्यांचे लग्न झाले, त्यानंतर त्यांना त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगी झाली. मुलीच्या एका वर्षानंतर त्यांनी तिचा चेहरा सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या फोटोनंतर राहावर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले होते.

आता राहा आणि तिचे आजोबा ऋषी कपूर यांचा एक फोटो व्हायरल होतो आहे. त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींना उधाण येत आहे.तो फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी आजोबा आणि नातीचं कौतुक केलं आहे. ऋषी कपूर हे राहाला पाहत असल्याचे त्या फोटोमध्ये दिसत आहे. वास्तविक तो फोटो काही खरा नसून एका चाहत्यानं तो तयार केल्याचे सांगण्यात येत आहे.

Rishi Kapoor And Raha Kapoor Photo
Rishi Kapoor And Raha Kapoor Photoesakal

नीतू कपूर यांनी तो फोटो आपल्या इंस्टा स्टोरीवर ठेवला असून त्यांनी तो शेयरही केला आहे. त्यात राहाचे दिवंगत आजोबा ऋषी कपूर हे नातीसोबत दिसून येत आहे. त्या फोटोला संगणकाच्या मदतीनं एडिट करण्यात आले आहे. नीतू कपूर यांनी त्याविषयी म्हटले आहे की, ही एवढी चांगली एडिटिंग आहे की, आम्हाला ते पाहून खूपच आनंद झाला...खूप खूप धन्यवाद...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com