'आरके'वरच्या व्यंगचित्रावर ऋषी कपूर भडकले

टीम ई सकाळ
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीत एेतिहासिक आरके स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी या घडल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. पण त्याला दोन दिवस उलटतात न उलटतात तोच या घटनेवर आधारित एक व्यंगचित्र ऋषी कपूर यांना एका चाहत्याने टॅग करून दाखवले. त्यानंतर मात्र चिंटू कपूर यांच्या रागाचा भडका उडाला. अशा प्रकारची चेष्टा अयोग्य असून तो राज कपूर यांचा अपमान आहे, यावर आम्ही नक्कीच अॅक्शन घेऊ असा संताप त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला आहे. 

मुंबई : काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीत एेतिहासिक आरके स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी या घडल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. पण त्याला दोन दिवस उलटतात न उलटतात तोच या घटनेवर आधारित एक व्यंगचित्र ऋषी कपूर यांना एका चाहत्याने टॅग करून दाखवले. त्यानंतर मात्र चिंटू कपूर यांच्या रागाचा भडका उडाला. अशा प्रकारची चेष्टा अयोग्य असून तो राज कपूर यांचा अपमान आहे, यावर आम्ही नक्कीच अॅक्शन घेऊ असा संताप त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला आहे. 

या व्यंगचित्रात आरके स्टुडिओला आग लागल्याचे दाखवून राज कपूर यांचेही चित्र काढण्यात आले आहे. यावर आगीचा आणि माझा फार जुना संबंध आहे. असे नमूद करण्यात आले आहे. आरके स्टुडिओमध्ये सर्वात पहिला चित्रपट चित्रित झाला तो आग होता. असा संदर्भ या व्यंगचित्राला आहे. यावर ऋषी कपूर यांनी आक्षेप घेतला आहे. 

Web Title: rishi kapoor cartoon aag RK studios esakal