रितेश देशमुख जोमात,जर्मनी कोमात;दादाचा नवीन व्हिडीओ एकदा पहाच

अभिनेता नेहमीच सोशल मीडियावर आपले व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांचे मनोरंजन करीत असतो.
Riteish Deshmukh
Riteish DeshmukhGoogle
Updated on: 

रितेश देशमुख(Riteish Deshmukh) हा बॉलीवूडला खळखळवून हसवणारा विनोदी अभिनेता म्हणून अधिक ओळखला जातो. त्यानं विनोदी अभिनयासोबतच अभिनयाच्या अनेक जॉनरच्या भूमिका साकारलेल्या आपण पाहिल्या आहेत. 'एक था व्हिलन' मधला रितेशने साकारलेला खलनायक सगळयांची प्रशंसा मिळवून गेला होता. तर मराठी 'लय भारी' सिनेमातील रितेशने साकारलेल्या भूमिकेनेही प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. आता मराठीत त्याचा पुन्हा एक सिनेमा येत आहे,ज्याचं नाव 'वेड' असे आहे. सध्या याचं चित्रिकरण जोमात सुरू आहे. रितेश-जेनिलायानं कोरोना काळात नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या लोकांना खळखळवून हसवायचं ठरवलं आणि सोशल मीडियावर त्यांनी आपले विनोदी शैलीत शूट केलेले व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरुवात केली.

रितेश-जेनेलियाच्या या व्हिडीओना खूप पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी त्यानं चीनला धारेवर धरत 'व्हायरस देशा' म्हणून संबोधत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्याला नेटकऱ्यांनीही चांगलीच पसंती दिली होती. पण आता त्यानं जो व्हिडीओ पोस्ट केलाय त्यात तो जर्मनीलाही व्हायरस म्हणताना दिसून येत आहे. अर्थात त्यानं जर्मनी देशाच्या नावाची फोड करून सांगितलेली आहे. जर्मनी=जर्म+मनी म्हणजेच व्हायरस देऊन पैसे कमावणारा देश. आता हे इन्स्टाग्रामवरील एक प्ले अ्ॅप आहे. ज्यावर साइनवरून देशाचं नाव ओळखायचं. धमाल गेम आहे. पण त्यामुळे बिचाऱ्या जर्मनी देशावर व्हायरस नावाचा टॅग लागला आहे. रितेशच्या या धम्माल व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे,''व्हायरस बोललास तर आम्हाला वाटलं चीन देश असावा तो''. आता यावरुन एवढं तर लक्षात येतंय की आता चीनवर व्हायरस देणारा देश हा टॅग कायमचा लागला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.