
Bollywood- देशात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. युपीमधील ललितपूरमध्ये (Uttar pradesh Crime) घडलेल्या अत्याचाराच्या प्रसंगानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या घटनेचे देशभर पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. आता बॉलीवूडमधील आघाडीचा (Rititesh Deshmukh) अभिनेता रितेश देशमुखनं त्या घटनेवर प्रतिक्रिया देताना तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. चार जणांनी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेनं लक्ष वेधून घेतले आहे. ती पीडिता जेव्हा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आली तेव्हा तेव्हा तेथील अधिकाऱ्यानं तिला तक्रार नोंदवून घेण्याच्या बहाण्यानं तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचं दिसुन आलं आहे.
बॉलीवूडमधील काही कलाकार हे नेहमीच समाजातील वेगवेगळ्या घडामोंडीविषयी प्रतिक्रिया देताना दिसून येतात. त्यात रितेश देशमुखचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागेल. यापूर्वी देखील त्यानं अनेक घटनांबाबत आपली प्रतिक्रिया परखडपणे दिली आहे. आपल्या बोलण्याचे लोकं काय अर्थ काढतात त्यापेक्षा जे बोलणं गरजेचं आहे ते बोललं पाहिजे अशी भूमिका रितेशनं नेहमीच घेतली आहे. आताही त्यानं या ज्वलंत प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशातील तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचाराची बातमी कळाल्यानंतर रितेश अस्वस्थ झाला आहे. त्यानं सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत त्या आरोपींप्रती तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, ही घटना जर खरी असेल तर ज्या नराधमांनी असं कृत्य केलं आहे त्यांना भरचौकात मारलं पाहिजे. या शब्दांत आपला राग व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे पीडिता जेव्हा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेली तेव्हा त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यानं तिचं शोषण केल्याचं दिसून आलं आहे. त्या अधिकाऱ्याचं नाव तिलकधारी सरोज असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. पोक्सो अॅक्ट अंतर्गत सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. नागरिकांनी त्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.