रितेश करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकची निर्मिती ?

ritesh deshmukh to make biopic on chatrapati shivaji maharaj says ajay
ritesh deshmukh to make biopic on chatrapati shivaji maharaj says ajay

मुंबई : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि सर्वांना उत्सुकता आहे ती यावर्षी येणाऱ्या नवीन चित्रपटांची ! नवीन वर्षात अनेक दमदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. दरम्यान चर्चा आहे ती 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाची. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असणार आहे. अजय देवगण तानाजींची भूमिका साकारणार आहे तर, सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभार राठोड यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तान्हाजींवर चित्रपट येणार असल्याने साहजिकच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. 

'तान्हाजी' चित्रपटासाठी अजय देवगण आणि टीम जबरदस्त प्रमोशन करत आहेत. यामध्ये अजयची पत्नी काजोल, सैफ अली खान, शरद केळकर, देवदत्त नागे, पंकज त्रिपाठी, जगपती बाबू ही मंडळीही असणार आहेत. दरम्यान अजयला या चित्रपटासंबंधी एका मुलाखतीमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकची आल्यास महाराजांची भूमिका कोणी साकारावी?' असा सवाल करण्यात आला. 

यावर उत्तर देताना अजयने अभिनेता रितेश देशमुखचे नाव घेतले. गेल्या काही दिवसांपासून रितेश शिवाजी महाराजांच्या बायोपिकवर काम करत असल्याची माहितीही अजयने दिली. पण, चित्रपटाविषयी अधिक काही खुलासा अजयने केला नाही. या प्रोजेक्टविषयीची अधिकृत माहिती रितेशने अद्याप दिलेली नाही. मात्र महाराजांवरचा बायोपिक चाहत्यांसाठी नक्कीच उत्सुकतेची बाब आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#JaiBhavani #jaishivrai

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd) on

तान्हाजी चित्रपटाच्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. दिग्दर्शन ओम राऊतने केली असून यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकर साकारणार आहे. हा चित्रपट येत्या 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com