Ritesh Deshmukh : "आपलं सरकार होतं पण..." 'वेड'मध्ये रितेशचा भलताच पंच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ritesh Deshmukh ved movie

Ritesh Deshmukh : "आपलं सरकार होतं पण..." 'वेड'मध्ये रितेशचा भलताच पंच

Ritesh Deshmukh : वेड चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने मराठी इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला. सर्व कलाकारांनी अप्रतिम भूमिका साकारली. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. 

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसला आहे. बघबघता या चित्रपटाने चांगलीच बाजी मारत अनेक रेकॉर्ड केले. मात्र हा चित्रपट आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. या चित्रपटात एक डायलॉग (पंच) असा आहे की ज्यामुळे चित्रपटगृहात एकच हश्या पिकतो. हा डायलॉग भाजपला टोला असल्याची चर्चा आहे. 

अभिनेता रितेश देशमुख म्हणजेच सत्या श्रावणीला भेटायला जातो. श्रावणी म्हणजे जिनिलिया ही पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरीवर असते. ती ऑफिसला असताना सत्या येतो. सत्या पैसे मागण्यासाठी श्रावणीकडे आला असतो. पण श्रावणी त्याला इथं कसे?, असा प्रश्न करते. यावर सत्या तिथे होतो इथं आलो. हे आपल पोस्ट पोस्ट ऑफिस, असे उत्तर देतो. यावर श्रावणी म्हणते हे आपलं नाही सरकारचं पोस्ट ऑफिस आहे. 

हेही वाचा: PM Narendra Modi : हुबळीत पंजाबची पुनरावृत्ती! PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुणाने...

त्यानंतर सत्याचा पंच चित्रपटगृहात हश्या पिकतो. "सरकार आपलं आहे, नाही आपलं होतं...", असे सत्या म्हणतो. त्यामुळे हा भाजपला टोला होता का?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

हेही वाचा: Satyajeet Tambe : राहुल गांधीचा कट्टर शिलेदार ते देवेंद्र फडणवीसांशी छुपी मैत्री, कसा आहे सत्यजीत तांबेंचा प्रवास...

रितेश देशमुखची मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. रितेश देशमुख यांचे वडील विलासरावर देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख काँग्रेमधील मोठं नेतृत्व होते. 

रितेशचा भाऊ अमित देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. ते काँग्रेसचे आमदार आहेत. अमित देशमुख यांच्या जाहीर सभांमध्ये रितेशने अनेकवेळा हजेरी लावली होती. 

हेही वाचा: Graduates Constituency Eection: सुधीर तांबेंवर होणार कारवाई? पिता-पुत्राच्या खेळीमुळं काँग्रेसची नाचक्की!