रितेश देशमुखचं त्या युजरला सडेतोड उत्तर, 'आधी पिक्चर जाऊन बघ तरी'

Ritesh deshmukh reacted on chhapaak movie boycott
Ritesh deshmukh reacted on chhapaak movie boycott

मुंबई : एनयुमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हणामारीचा निषेध देशभरातून होत असतानाच, बॉलिवूडची मंडळीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. अशातच 'छपाक'गर्ल दीपिका पदुकोन काल (ता. 7) थेट जेएनयुमध्ये पोहोचली. तिच्या या आंदोलनात सहभागी होण्यावरून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. #boycottchhapaak असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला. तिचा आगामी 'छपाक' चित्रपट कोणीही बघू नका असे आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक दिवस राहिला असून त्याच्या रिलिज होण्यासाठी सोशल मीडियावर आक्षेप घेतला जातोय. रितेशला याचविषयी एका युजरने सवाल केला आणि परखड भाषेत रितेशने त्याला उत्तर दिलं आहे.

चित्रपटातील मालती अग्रवाल (दीपिका पदुकोन) हिच्यावर अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव 'राजेश' असं दाखविण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आरोपीचा धर्म बदलण्यात आला असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे चित्रपट बॅन करा अशी घोषणा नेटकरी करत आहेत. दरम्यान बॉलिवूड कलाकारांसाठी, पत्रकार आणि बि-टाऊनमधील मंडळींसाठी प्रिमिअर स्क्रिनिंग होता. त्यानंतर अभिनेता रितेश देशमुखला एका ट्विटर युजरने 'छपाक' विषयी प्रश्न केला. त्या युजरने विचारले, 'नदीम खानचं नाव राजीव कसं काय झाल?'.
या खोचक प्रश्नावर रितेशने चांगलीच प्रतिक्रिया दिली. रितेश त्याला म्हणाला, '' बेटा, आधी चित्रपट जाऊन बघ तरी. मग, हा प्रश्न विचार''. या प्रतिक्रियेने युजरची बोलती बंद केली आहे. 

'छपाक' वादाच्या भोवऱ्यात अडकला असून आता मात्र कोर्टाकडून त्याला दिलासा मिळाला आहे. वकील अपर्णा भट्ट यांनी चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली होती. अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अग्रवालची केस त्यांनी अनेक वर्षे लढली. सिनेमाच्या दिग्दशकांनी चित्रपटामध्ये अपर्णा यांना योग्य क्रेडिट देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, चित्रपटाच्या प्रिमिअरमध्ये तसे झाले नाही म्हणूनच अपर्णा यांनी चित्रपटाच्या रिलिजवर आक्षेप घेतला. अखेर पटियाला हाऊस कोर्टने चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना क्रेडिट देण्याचे आदेश दिले असून प्रदर्शना कोणत्याही प्रकारचा रोख नसल्याचा निर्णय दिला आहे. उद्या 10 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com