Zee Talkies Award : रितेशचा 'वेड' की केदारचा 'बाईपण भारी देवा', 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?

मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
Ritesh Deshmukh Ved Kedar Shinde Baipan Bhari Deva
Ritesh Deshmukh Ved Kedar Shinde Baipan Bhari Deva esakal

Ritesh Deshmukh Ved Kedar Shinde Baipan Bhari Deva : मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. गेले वर्ष मराठी मनोरंजन विश्वासाठी चांगलेच लाभदायी ठरले होते. त्यात अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. झिम्मा २ तसेच बाईपण भारी देवा सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. बॉक्स ऑफिसवर देखील त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.

अशातच नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वेध लागतात ते पुरस्कार सोहळ्याचे. या सगळ्यात मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराची सर्वाधिक चर्चा असते. गेल्या वर्षभरात प्रदर्शित मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तत्पूर्वी 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्कार सोहळ्यात विविध विभागांमध्ये नामांकन यादीत कोणी बाजी मारली हे निश्चित झाले आहे . झी टॉकीजवर हा दिमाखदार पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे .

Ritesh Deshmukh Ved Kedar Shinde Baipan Bhari Deva
Ritesh Deshmukh Ved Kedar Shinde Baipan Bhari Deva

मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाचा आणि कलेचा कस लावून रसिक मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी कलाकारही वाट पाहत असतात .त्यांच्या कलेला दाद देणारा आणि रसिकमनाची पावती देणारा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' हा पुरस्कार रसिकांच्या पसंतीतून निवडला जातो. नुकतीच या पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली. या जाहीर झालेल्या नावांमधून रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या मतानंतर ‘महाराष्ट्राचा फेवरेट’ ही मानाची ट्रॉफी कलाकारांना दिली जाणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही एकूण बारा विभागातून 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?' या पुरस्काराचे मानकरी ठरवण्यात येणार आहेत .यामध्ये महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट , फेवरेट दिग्दर्शक , फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री , फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक , फेवरेट लोकप्रिय चेहरा , फेवरेट स्टाईल आयकॉन, फेवरेट गीत, फेवरेट गायक , फेवरेट गायिका आणि फेवरेट चित्रपट बाह्य गीत या विभागांसाठी नामांकने जाहीर झाली आहेत.

Ritesh Deshmukh Ved Kedar Shinde Baipan Bhari Deva
Ritesh Deshmukh Ved Kedar Shinde Baipan Bhari Deva

सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत यावर्षी वेड, बाईपण भारी देवा, सुभेदार ,महाराष्ट्र शाहीर ,वाळवी, नाळ २, झिम्मा २ , घर बंदूक बिरयानी या चित्रपटांनी नाव कोरली आहेत. त्यामुळे प्रेक्षक पसंतीचा कौल यंदा कोणत्या सिनेमाला मिळतो आणि महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट कोणता ठरतो, हे लवकरच समजणार आहे .

‘फेवरेट दिग्दर्शक’ या नामांकनामध्ये रितेश देशमुख, केदार शिंदे , दिग्पाल लांजेकर, परेश मोकाशी, सुधाकर रेड्डी सुधाकर रेड्डी यक्कंटी, हेमंत ढोमे , हेमंत अवताडे यांची वर्णी लागली आहे.

Ritesh Deshmukh Ved Kedar Shinde Baipan Bhari Deva
Kangana Ranaut: भाजप समर्थक आहे म्हणून? कंगणाच्या बिल्किस बानोवरील चित्रपटाला जिओ देत नाहीय परवानगी!

‘फेवरेट अभिनेता’ या विभागातील नामांकनासाठी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, रितेश देशमुख, सुबोध भावे, नागराज मंजुळे आणि अजय पुरकर यांची नावे असून ‘फेवरेट अभिनेत्री’ या विभागाअंतर्गत ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील अभिनेत्रींची टीम तसेच 'वेड' चित्रपटासाठी जिनिलीया देशमुख, ‘झिम्मा 2’ या चित्रपटातील अभिनेत्रींची टीम आणि 'वाळवी' साठी शिवानी सुर्वे यांच्या नावांचा समावेश आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com