esakal | Big News : एनसीबीच्या चौकशीत रिया ढसा ढसा रडली; ड्रग्सबाबत केला मोठा खुलासा, वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Riya Chakraborty confessed to the crime

आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीला चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे दररोज नवनवीन खुलासे होत आहे. आता या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये रियाने सुशांतच्या कुटुंबाबद्दलही सांगितले. त्यामुळे एनसीबीने मुंबई पोलिस आणि सीबीआयला विनंती केली आहे की, सुशांतच्या घरातून ताब्यात घेतलेल्या साहित्याची तपासणी करण्यासाठी मागणी केली आहे.

Big News : एनसीबीच्या चौकशीत रिया ढसा ढसा रडली; ड्रग्सबाबत केला मोठा खुलासा, वाचा सविस्तर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने काहीच महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. यानंतर आत्महत्येच्या मागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला बॉलीवूडमधील मोठे अभिनेते, निर्माते आणि एका राजकीय पक्षाच्या नेत्यावर संशय उपस्थित करण्यात आला. तसेच रिया चक्रवर्तीवर सर्वाधिक संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर हे प्रकरण ड्रग्सकडे वळले. एनसीबीच्या चौकशीत रियाने आपणच ड्रग्स मागवित असल्याची कबुली दिली आहे. यामुळे या प्रकरणात आणखी कोण कोण अडकतात हेच पाहणे बाकी आहे.

रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक या दोघांची रविवारी अंमली पदार्थ विरोधी पथक एनसीबीने चौकशी केली. दोघांनाही समोरासमोर बसून चौकशी केली असता रिया ढसा ढसा रडू लागली. यानंतर रियाची स्वतंत्र्य चौकशी करण्यात आली होती. एकट्यात तिच्यावर प्रश्नांचा भाडीमार करण्यात आला. तब्बल ६० ते ७० प्रश्नांचा भाडीमार केल्यानंतर तिने फक्त १५ प्रश्नांचीच उत्तरे दिली. यावेळी तिने आपणच ड्रग्स मागवले असल्याची कबुली दिली.

हेही वाचा - पितृपक्ष : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण

तसेच या प्रकरणात अटकेत असलेल्या मिरांडा आणि रियाची समोरासमोर चौकशी केली. यावेळीही रियाला तू ड्रग्स घेतले का? असे प्रश्न विचारले होते. यावर्षी मार्च आणि एप्रिल महिण्यात दिपेशकडून ड्रग्स मागवले होते. परंतु, आपण ड्रग्स घेतले नाही, असे रिया चक्रवर्तीने स्पष्ट केले. आपण ड्रग्स घेत नाही परंतु आपण सिगारेट ओढत असल्याचे सांगितले. रियाने हेही कबुल केले की ड्रग्स डिलर बासिद परिहारशी पाच वेळा भेटली होती. त्याची भेटही सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी झाली होती.

आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीला चांगलाच वेग आला आहे. त्यामुळे दररोज नवनवीन खुलासे होत आहे. आता या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये रियाने सुशांतच्या कुटुंबाबद्दलही सांगितले. त्यामुळे एनसीबीने मुंबई पोलिस आणि सीबीआयला विनंती केली आहे की, सुशांतच्या घरातून ताब्यात घेतलेल्या साहित्याची तपासणी करण्यासाठी मागणी केली आहे. यात कुठे सीबीडी ऑइल सारखा पदार्थ कुठे आढळतो का हे एनसीबीला पाहायचे आहे.

अधिक माहितीसाठी - .. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण? ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का?

शूटिंगच्या दरम्यानच घ्यायचा ड्रग्स

सुशांत सिंह राजपूत नैराश्यग्रस्त झाला होता. त्याचा अलीकडेच एक सिनेमा रिलीज झाला होता. त्यानंतर सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानच सुशांत ड्रग्स घेत होता, अशी माहितीही रियाने दिली. रियाने आणखी एका मोठ्या व्यक्तीच्या उल्लेख केला आहे. परंतु, एनसीबीने त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास मनाई केली आहे.

या कारणाने टूर सोडला होता अर्धवट

सुशांत सिंह राजपूत हा ड्रग्सच्या आहारी गेला होता. आम्ही जेव्हा युरोप फिरण्यासाठी गेलो होतो. तेव्हा सुशांतने ही टूर अर्धवट सोडून दिली होती. कारण, या टूरमध्ये सुशांतला कुठे ड्रग्स मिळत नव्हते. सुशांतच्या फार्महाऊसवर नेहमी पार्ट्या होत होत्या. यावेळी बरेच जण ड्रग्स घेत होते. या पार्ट्यांमध्ये छोट्या कलाकारांपासून ते मोठे कलाकारही येत होते. सर्वच जण ड्रग्स घेत होते, असेही रियाने सांगितलं.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

संपादन - नीलेश डाखोरे