रोडिज फेम रफ्तार अन् कोमल व्होरा घेणार घटस्फोट, ६ वर्षांपूर्वी झाले होते लग्न | Rapper Raftaar Divorce | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rapper Raftaar And Komal Vohra News

Rapper Raftaar Divorce : रोडिज फेम रफ्तार अन् कोमल व्होरा घेणार घटस्फोट

Rapper Raftaar Divorce :

मनोरंजन क्षेत्रातील आणखी एका जोडप्याने फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बाॅलीवूड रॅपर रफ्तार आणि त्याची पत्नी कोमल व्होरा (Komal Vohra) असे त्या जोडप्याचे नाव आहे. या दोघांनी सहा वर्षांपूर्वी लग्न केले होते. मात्र आता त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. बातम्यांनुसार ते काही काळापासून वेगवेगळे राहत आहेत. या वर्षी ऑक्टोबरमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यांनी घटस्फोटासाठी २०२० मध्ये अर्ज दाखल केला होता. मात्र कोविड महामारीमुळे त्यास विलंब झाला.

हेही वाचा: आता कुणाला खरा वाघ म्हणायचं, हेमांगी कवीचा सवाल

कोमल ही प्रसिद्ध टीव्ही कलाकार करण आणि कुणाल व्होरा यांची बहीण आहे. तसेच कोमल ही इंटेरिअर डिझाईनर आहे. तिने भाऊ करण आणि कुणालबरोबर काही शोज् केले आहेत. जसे जिंदगी की मेहक आणि ब्रह्मराक्षस. कोमल आणि रफ्तार (अका दिलीन नायर) हे दोघे २०११ एका मित्राच्या घरी भेटले. नंतर त्यांनी २०१६ मध्ये लग्न केले. त्यानंतर रफ्तारने त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो शेअर करुन लिहिले की मी माझ्या प्रिय व्यक्तीबरोबर लग्न केले. सध्या मात्र दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरुन अनफाॅलो केले असून त्यांचे छायाचित्रे डिलिट केले आहेत.

हेही वाचा: Maharashtra | बंडखोर शिवसेना आमदारांची हाॅटेलवारी जोरात, जनता मात्र वाऱ्यावर

रफ्तारने २०१९ मध्ये हस्टल, डान्स इंडिया डान्स आणि रोडीज या कार्यक्रमातून परीक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. मधेच त्यांनी 'रोडिज' हा कार्यक्रम सोडला. २०१५ मध्ये त्याने 'झलक दिखला जा ८' या कार्यक्रमात सहभाग झाला होता. रॅपरने 'बुलेट राजा', 'फगली', 'अंधाधुन' आणि यासारख्या चित्रपटांना संगीत दिले.

Web Title: Roadies Fame Raftaar And Wife Komal Vohra Headed For A Divorce

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bollywood Newsbollywood
go to top