प्रसिध्द दिग्दर्शक एस शंकर यांना मातृशोक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Director s shankar

प्रसिध्द दिग्दर्शक एस शंकर यांना मातृशोक

मुंबई - तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक एस शंकर ( director s shankar ) यांच्यावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई मुथ्थुलक्ष्मी यांचे निधन झाले आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत काही ठीक नव्हती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. एस शंकर यांच्या आईचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे आईंना श्रध्दांजली अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली आहे. ( director s shankar mother passes away at 88 )

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुथुलक्ष्मी यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सध्या सोशल मीडियावर एस शंकर यांच्या आईला मोठ्या प्रमाणात श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून त्या एका दुर्धर आजारानं त्रस्त होत्या. प्रसिध्द दिग्दर्शक चरण यांनी एस शंकर यांचे सांत्वंन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, प्रिय शंकर तुमच्या मातोश्रींना आदरांजली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो....

एस शंकर ( director shankar ) हे तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक आहेत. त्यांनी नॅशनल अॅवॉर्डही आपल्या नावावर केले आहेत. ते आता अभिनेता रणवीर सिंगबरोबर एक चित्रपट करणार आहेत. तो चित्रपट त्यांच्याच अनियान नावाच्या चित्रपटावर आधारित आहे. त्याचा हा रिमेक असणार आहे. त्यांनीच काही दिवसांपूर्वी त्याविषयी माहिती दिली होती. आता त्याचे चित्रिकरण कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: इथं परिस्थिती काय आहे? वादळात उखडलेल्या झाडाजवळ अभिनेत्रीचं फोटोशूट

हेही वाचा: लग्न झाले? सिंदूर लावलेल्या फोटोवर गीताचा खुलासा

2005 मध्ये शंकर यांचा एक सायकोथ्रिलर अनियान नावाचा मुव्ही आला होता. त्याला प्रेक्षकांनी पसंत केले होते. मात्र रणवीरच्या मुव्हीचे नाव अद्याप घोषित झालेले नाही. त्याचे चित्रिकरण पुढच्या वर्षी सुरु होणार आहे.

Web Title: Robot Director S Shankar Mother Passes Away At 88 Due To Age Related

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..