रॉकस्टार सोनाक्षी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

जस्टिन बीबर हा हॉलीवूडचा रॉकस्टार गायक 10 मे रोजी त्याच्या "पर्पज वर्ल्ड टूर'साठी भारतात एक कॉन्सर्ट करणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमला ही कॉन्सर्ट होणार आहे. पण या कॉन्सर्टमधली एक महत्त्वाची बाब म्हणजे कदाचित या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आणि ऍक्‍शन क्वीन सोनाक्षी चक्क गाणार असल्याची चर्चा आहे. नुकतंच तिने आपल्याला या कॉन्सर्टमध्ये गायची संधी मिळण्याची इच्छा बोलून दाखवली. ती त्यासाठी एक गाणंसुद्धा तयार करते आहे. या कॉन्सर्टमध्ये जर सोनाक्षी गायली तर जस्टिनच्या या कॉन्सर्टला चार चॉंद लागतील हे सांगण्याची काही वेगळी गरज नाही.

जस्टिन बीबर हा हॉलीवूडचा रॉकस्टार गायक 10 मे रोजी त्याच्या "पर्पज वर्ल्ड टूर'साठी भारतात एक कॉन्सर्ट करणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमला ही कॉन्सर्ट होणार आहे. पण या कॉन्सर्टमधली एक महत्त्वाची बाब म्हणजे कदाचित या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूड अभिनेत्री आणि ऍक्‍शन क्वीन सोनाक्षी चक्क गाणार असल्याची चर्चा आहे. नुकतंच तिने आपल्याला या कॉन्सर्टमध्ये गायची संधी मिळण्याची इच्छा बोलून दाखवली. ती त्यासाठी एक गाणंसुद्धा तयार करते आहे. या कॉन्सर्टमध्ये जर सोनाक्षी गायली तर जस्टिनच्या या कॉन्सर्टला चार चॉंद लागतील हे सांगण्याची काही वेगळी गरज नाही. याआधी सोनाक्षीने ग्लोबल सिटीझन इंडियाच्या मुंबईत झालेल्या कॉन्सर्टमध्ये रॉकिंग परफॉर्मन्स देऊन आपली गायकी अख्ख्या जगासमोर दाखवून दिलीच होती. आणि तिला गायला खूप आवडतं, हेही तिने या कॉन्सर्टमध्ये सांगितलं होतं. जस्टिनच्या कॉन्सर्टमध्ये गाऊन तिच्यातलं हे टॅलेंट ती पुन्हा एकदा जगासमोर आणेल. 

Web Title: rockstar sonakshi sinha