Dhindhora Song : आलिया-रणवीर नाचताहेत, पण जया बच्चनला का आला राग?

एकीकडे रणवीर आणि आलिया यांचा जोरदार डान्स सुरु असताना नेटकऱ्यांनी जया बच्चन यांच्या रागीटपणाचे कारण विचारले आहे.
Rocky Aur Raani Dhindhora Song
Rocky Aur Raani Dhindhora Songesakal

Rocky Aur Raani Dhindhora Song Jaya Bachchan Reaction : बॉलीवूडमध्ये सध्या करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले होते. बऱ्याच दिवसानंतर रणवीरचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे त्याची चर्चा सुरु झाली आहे.त्यात त्याच्या जोडीला आलिया भट्ट दिसणार आहे.

आलिया आणि रणवीर सिंगचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी ते गली बॉयमध्ये दिसले होते. करण जोहरच्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र, जया बच्चन या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. रॉकी और रानीमधील ढिंढोरा नावाचे गाणे व्हायरल झाले आहे. त्याचा टीझर सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. त्यात रणवीर, आलिया आणि जया बच्चन दिसत आहेत. यावेळी जया बच्चन यांचा लूक गप्पांचा विषय आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

एकीकडे रणवीर आणि आलिया यांचा जोरदार डान्स सुरु असताना नेटकऱ्यांनी जया बच्चन यांच्या रागीटपणाचे कारण विचारले आहे. काही नेटकऱ्यांनी यावर दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे. एका नेटकऱ्यानं म्हटले आहे की, जयाजी तुमचा चेहरा नेहमीच रागीट का असतो. सगळं काही आनंदात असताना तुम्ही चिडता का, काय प्रॉब्लेम आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे.

Rocky Aur Raani Dhindhora Song
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

सोशल मीडियावर व्हायरल होणारे एखादे गाणे असो किंवा खऱ्या आय़ुष्यातील एखादा प्रसंग जयाजी या नेहमीच रागावलेल्या का दिसतात हे कळत नाही. त्यावरुन सध्या सोशल मीडियावर जयाजी यांच्याविषयी व्हायरल झालेल्या मीम्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काहींनी जयाजी चिडतात हा चित्रपटातील क्लायमॅक्स असल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com