Rohan Joshi : चला, सुटका तर झाली; राजू श्रीवास्तवच्या निधनावर रोहन जोशीची वादग्रस्त टिप्पणी; आता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohan Joshi Controversial Comment

Rohan Joshi : चला, सुटका तर झाली; राजूच्या निधनावर रोहन जोशीची टिप्पणी; आता...

Rohan Joshi Controversial Comment प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देश शोकसागरात बुडाला असतानाच स्टँडअप कॉमेडियन रोहन जोशीच्या ट्विटने खळबळ उडवून दिली. राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूवर त्यांनी असंवेदनशील टिप्पणी केली. राजूच्या मृत्यूला जोशीने कर्म म्हटले होते. रोशन जोशीला (Rohan Joshi) या वक्तव्यामुळे जोरदार टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ही वादग्रस्त टिप्पणी हटवली आणि आपली बाजू स्पष्ट केली.

२१ सप्टेंबर रोजी राजू (Raju Srivastav) यांच्या निधनानंतर चाहते आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली होती. सोशल मीडियावर लोक राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली अर्पण करीत होते. ‘राजू यांच्या निधनाने भारतीय स्टँडअप कॉमेडीचे (Comedian) मोठे नुकसान झाले आहे’ अशी पोस्ट यूट्यूबर अतुल खत्रीने लिहिली. अतुल खत्रीच्या या पोस्टवर रोहन जोशीने दीर्घ टिप्पणी केली.

हेही वाचा: Raju Srivastav : राजू श्रीवास्तवची नेट वर्थ ते दाऊद इब्राहिमकडून धमकी; काही खास गोष्टी

‘स्टँडअपची नवीन लाट सुरू झाल्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी नवीन कॉमिक्सच्या विरोधात बोलण्याची संधी कधीही सोडली नाही. ते येणाऱ्या कलाप्रकाराविरुद्ध वृत्तवाहिनीवर सतत बोलत होते. नवीन शैली समजत नसल्याने आक्षेपार्ह म्हणत होते. त्यांनी काही चांगले विनोद बोलले असतील, पण त्यांना कॉमेडीबद्दल काहीच माहीत नव्हते. चला, सुटका तर झाली’ अशी पोस्ट रोहन जोशीने (Rohan Joshi) लिहिली होती.

यानंतर रोहन जोशीला चांगलेच ट्रोल केले गेले. मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया पाहून रोहन जोशीने आपली कमेंट डिलीट केली. स्पष्टीकरण देताना लिहिले की, ‘एक मिनिटाच्या रागानंतर मला वाटले की आज वैयक्तिक भावना व्यक्त करण्याचा दिवस नाही. हा विचार करून पोस्ट हटवली. मी तुम्हाला दुखावले असल्यास क्षमस्व...’

हेही वाचा: Gauri Khan : आम्ही जे भोगलो त्यापेक्षा...; गौरीने आर्यन खानच्या प्रकरणावर मौन सोडले

रोहन जोशी चाहत्याच्या निशाण्यावर

रोहन जोशीने आपल्या असंवेदनशील कमेंटबद्दल माफी मागितली असली तरी तो युजर्सच्या निशाण्यावर आला आहे. लोक त्याला ट्रोल करण्याची संधी सोडत नाही आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल अशा कमेंट करणे लोकांना आवडले नाही. या क्षणी राजूच्या कुटुंबावर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा स्थितीत अशी असंवेदनशील गोष्ट बोलणे लोकांचा रोष भडकवण्यासाठी पुरेसे आहे.

Web Title: Rohan Joshi Controversial Comment Raju Srivastav Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :deathComedian