Raju Srivastav : राजू श्रीवास्तवची नेट वर्थ ते दाऊद इब्राहिमकडून धमकी; काही खास गोष्टी

राजू श्रीवास्तव एकेकाळी भारतातील सर्वाधिक कमाई करणारे कॉमेडियन होते
Raju Srivastav Latest News
Raju Srivastav Latest NewsRaju Srivastav Latest News

Raju Srivastav Latest News उत्तम कॉमेडीने नेहमी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी बुधवारी (ता. २१) जगाचा निरोप घेतला. बुधवारी सकाळी १०.२० वाजताच्या सुमारास राजू यांचे निधन झाले. राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्यापासून चाहत्यांना त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची इच्छा आहे. चला तर जाणून घेऊ या राजू श्रीवास्तवबद्दल काही खास गोष्टी...

राजू श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती सुमारे २० कोटी रुपये आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होस्टिंग, जाहिराती, रिॲलिटी शो आणि स्टेज शो आहे. याशिवाय राजू यांचे कानपूरमध्ये घर आहे. राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्याकडे इनोव्हा, ऑडी Q७ आणि BMW ३ सिरीज अशा कार आहेत. राजूच्या ऑडीची किंमत सुमारे ८२ लाख रुपये आणि बीएमडब्ल्यूची किंमत सुमारे ४७ लाख रुपये आहे.

Raju Srivastav Latest News
KBC 14 : क्रिकेटशी संबंधित ‘या’ प्रश्नावर अडकल्या कविता; तुम्हाला माहितीये उत्तर?

एकदा राजूला दाऊद इब्राहिमवर विनोद केल्यामुळे धमक्याही आल्या होत्या. २०१० मध्ये राजूने दाऊदवर काही विनोद केले होते. जे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. विनोदाचा (Comedian) क्लिप व्हायरल झाल्या तेव्हा त्यांना पाकिस्तानकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजूलाच नाही तर कुटुंबालाही धमक्या दिल्या जात होत्या. याला राजू घाबरला नसला तरी सचिव राजेश शर्मा यांनाही धमक्या येऊ लागल्यावर त्यांनी पोलिस बंदोबस्त घेतला.

राजू श्रीवास्तव यांच्या खास गोष्टी

  • राजू श्रीवास्तव हे उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी होते.

  • राजे यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते.

  • राजू श्रीवास्तव यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे कवी होते.

  • राजू श्रीवास्तव हे लहानपणापासूनच उत्तम नक्कल करणारे कलाकार होते.

  • राजू यांना अभिनयासोबतच विनोदाचीही आवड होती.

  • राजू श्रीवास्तव यांनी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितच्या तेजाब या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

  • राजू श्रीवास्तव एकेकाळी भारतातील सर्वाधिक कमाई करणारे कॉमेडियन होते.

  • राजू श्रीवास्तव यांनी शेखर सुमनचा टीव्ही शो देख भाई देख (१९९४) मध्येही कॅमिओ केला होता.

  • राजू श्रीवास्तव यांनी मुकेश खन्ना यांच्या ‘शक्तिमान’ या सुपरहिरो शोमध्येही काम केले होते.

  • राजू श्रीवास्तव यांनी बाजीगर, मैने प्यार किया आणि मैं प्रेम की दिवानी हूं यासह काही हिट बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

  • २०१३ मध्ये राजू श्रीवास्तवने नच बलिए ६ या डान्स रियालिटी शोमध्ये परफॉर्म केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com