सरकार 3' मध्ये रोहिणी हट्टंगडी "

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 मार्च 2017

साध्या, सोज्वळ व उपदेश देणाऱ्या जान्हवीच्या आजे सासूबाईंच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता नव्या अवतारात रसिकांच्या भेटीला येणार आहेत. राम गोपाल वर्माचा लोकप्रिय चित्रपट "सरकार'च्या तिसऱ्या भागात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. "सरकार 3' चित्रपटात त्यांनी राजकीय नेत्या रुक्कूबाईची भूमिका साकारलीय. त्यांचा लूक नुकताच रीलिज केला आहे. या चित्रपटात रुक्कूबाईला सरकार म्हणजेच सुभाष नागरे (अमिताभ बच्चन) यांना देशोधडीला लावायचं असतं. रोहिणी हट्टंगडी यांनी यापूर्वी अशा प्रकारची भूमिका निभावलेली नसल्याचं त्या सांगतात.

साध्या, सोज्वळ व उपदेश देणाऱ्या जान्हवीच्या आजे सासूबाईंच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आता नव्या अवतारात रसिकांच्या भेटीला येणार आहेत. राम गोपाल वर्माचा लोकप्रिय चित्रपट "सरकार'च्या तिसऱ्या भागात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. "सरकार 3' चित्रपटात त्यांनी राजकीय नेत्या रुक्कूबाईची भूमिका साकारलीय. त्यांचा लूक नुकताच रीलिज केला आहे. या चित्रपटात रुक्कूबाईला सरकार म्हणजेच सुभाष नागरे (अमिताभ बच्चन) यांना देशोधडीला लावायचं असतं. रोहिणी हट्टंगडी यांनी यापूर्वी अशा प्रकारची भूमिका निभावलेली नसल्याचं त्या सांगतात. त्या पहिल्यांदाच रामगोपाल वर्मासोबत काम करत आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, अमित साध व यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: rohini hattangadi sarkar 3