'सिंबा'नंतर रोहीत आणि रणवीर पुन्हा एकत्र, नव्या अ‍ॅक्शन प्रोजेक्टवर काम सुरु

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांच्या प्रोजेक्टची एक झलकही शेअर केली आहे
rohit shetty
rohit shettysakal

बॉलीवुडचा फेमस डिरेक्टर रोहित शेट्टी आपल्या अफलातूल अॅक्शन चित्रपटांसाठी चर्चेत असतो. त्याच्या नवीन प्रोजेक्टची चाहते नेहमीच वाट बघत असतात. २०१८ साली रोहितने रणवीर सिंगसोबत केलेल्या सिंबाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या दोघांची जोडी पडद्यावर नेहमीच धुमाकूळ घालत असते त्यांनतर या दोघांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे.

rohit shetty
येरवड्यात संजूबाबा पहाटे दोनला उठून हनुमान मंत्र म्हणायला बसायचा ते थेट...

यावेळी रोहित शेट्टी त्याच्या चाहत्यांसाठी कमर्शियल एंटरटेनर घेऊन येत असल्याचं समजतंय, ज्यात रणवीर सिंगचा अॅक्शन मोड पाहायला मिळणार आहे. रोहितच्या या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग सुरू झालं आहे. रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांच्या प्रोजेक्टची एक झलकही शेअर केली आहे.

rohit shetty
'यूएसमध्ये गांजा ओढायचो'; आर्यन खानची NCB समोर कबुली

व्हिडिओमध्ये रणवीर सिंग अॅक्शन करताना पाहायला मिळतोय तर रोहित शेट्टी शूटिंगचे दिग्दर्शन करत आहे. रणवीर सिंहने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बॉस आणि बाबा पुन्हा एकत्र येत आहेत.'

rohit shetty
लाइव्ह परफॉर्मन्स करताना प्रसिद्ध मल्याळम गायकाचं निधन; स्टेजवरच सोडला प्राण

त्याचवेळी रोहित शेट्टीने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आम्ही नूडलची जाहिरात कशी शूट करतो याची एक झलक... मला माहित आहे की त्यातही गाड्या उडत आहेत, पण काय करणार...आम्हाला सरळ काम तर येतच नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर हा कोणत्या प्रोजेक्टचा भाग आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दरम्यान व्हिडीओवरून तर असं दिसतय की, चिंग्स अॅडच्या शूटिंगचा हा व्हिडिओ आहे. ज्यासाठी रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग एकत्र आले आहेत.

rohit shetty
राणा दाम्पत्य पुन्हा अडचणीत, गुन्हा दाखल

दरम्यान, रणवीर सिंग नुकताच 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात पाहायला मिळाला होता. हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला, पण चित्रपट म्हणावी तशी कमाई करू शकला नाही. मात्र आता रोहित आणि रणवीर एकत्र आल्याने येणारा प्रोजेक्ट जबरदस्त असणार अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com