दिलदार रोहित शेट्टी; कोरोना रुग्णांसाठी करतोय आर्थिक मदत

'तो ऑनस्क्रीन खतरों के खिलाडी असला तरी खऱ्या आयुष्यात..'
rohit shetty
rohit shetty

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी संपूर्ण देश सामना करत असताना सर्वसामान्यांपासून अनेक सेलिब्रिटीसाठी गरजूंच्या मदतीसाठी पुढाकारा घेत आहेत. पडद्यावर 'खतरों के खिलाडी' म्हणून वावरणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी Rohit Shetty खऱ्या आयुष्यात अनेकांची मदत करत आहे. विशेष म्हणजे या मदतीचा कोणताच गाजावाजा तो करत नाहीये. अकाली दलचे Akali Dal प्रवक्ते मजिंदर सिंग सिरसा Manjinder Singh Sirsa यांनी पोस्ट लिहित रोहितचं कौतुक केलं आहे. कोव्हिड केअर सुविधांसाठी रोहितने ठराविक रकमेची मदत केली असून मजिंदर यांनी शुक्रवारी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. (Rohit Shetty donates a significant amount to a COVID care facility Manjinder Singh Sirsa thanked him)

'तो ऑनस्क्रीन 'खतरों के खिलाडी' असेल, पण पडद्यामागे तो माणुसकी फार जपतो. कोव्हिड केअर सुविधांसाठी मदत केल्याने रोहित शेट्टीचे आभार. या मदतीच्या बदल्यात तुम्हाला खूप आशिर्वाद मिळू दे', अशी पोस्ट त्यांनी लिहिली. रोहितने किती रुपयांची आर्थिक मदत केली याबद्दलची माहिती मजिंदर यांनी दिली नाही. पण विरल भयानीच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, त्यांच्या कोव्हिड केअरमध्ये २५० बेड्स असून सर्व सुविधा मोफत आहेत.

हेही वाचा : 'आई कुठे काय करते'ची अभिनेत्री करतेय रुग्णांच्या नातेवाईकांची मदत

गेल्या वर्षीही रोहित शेट्टीने लॉकडाउनमध्ये अनेक गरजूंची मदत केली होती. कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या मुंबई पोलिसांसाठी त्याने हॉटेलची व्यवस्था करून दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com