सौ सोनार की एक लोहार की, 'त्या' एका वाक्यात मृन्मयीने ट्रॉलर्सला गार केलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mrunmayee deshpane answered to trollers

सौ सोनार की एक लोहार की, 'त्या' एका वाक्यात मृन्मयीने ट्रॉलर्सला गार केलं

Mrunmayee deshpande birthday : नाविन्यपूर्ण भूमिकेतून कायमच प्रेक्षकांची मने जिंकून घेणारऱ्या अभिनेत्री मृण्मयी देशपांचे हिचा आज वाढदिवस. (mrunmayee deshpande) मृण्मयीकडे असलेली अभिनयाची जाण, भूमिकेवरील पकड ही तिच्या अभिनयाला अधिकच वर घेऊन जाते. तिच्या सर्व भूमिका चाहत्यांचा लक्षात राहिलेल्या आहेत. मग ते झी मराठी वरील 'कुंकू' या मालिकेतील तिची भूमिका असो, अग्निहोत्र किंवा मग आता सूत्रसंचालक म्हणून तिने 'सारेगमप' मध्ये केलेली धमाल असो. केवळ मालिकाच नाही नाही तर नाटक आणि चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'कट्यार काळजात घुसली', 'नटसम्राट' ते शेर शिवराज मधील 'केसर' अशा तिची अनेक रूपे रसिकांनी पाहिली आणि त्यांना भावलीही. कलेच्या प्रवासात कलाकार आणि ट्रॉलर्स यांचं एक वेगळंच समीकरण आहे. मृण्मयीने तर एकदा ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला होता, तोच हा किस्सा.. (mrunmayee deshpande birthday story she answered to trollers)

हेही वाचा: दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक, सोशल मिडियावर दिली माहिती..

जेव्हा एखादा कलाकार एखादी भूमिका करतो, किंवा भूमिका मांडतो तेव्हा त्याला बऱ्याचदा ट्रोल केले जाते. हल्ली तर या ट्रोलर्सचे प्रमाण वाढतच आहे. बऱ्याचदा हे ट्रोलर्स पातळी सोडून टीका करतात. अशावेळी काही कलाकार दुर्लक्ष करतात तर काही कलाकार जशास तसे उत्तर देतात. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हि सडेतोड उत्तर देणारी आहे. तिचा स्पष्टवक्ते पणा सर्वांनाच ठाऊक आहे. मध्यंतरी तिच्या एका कार्यक्रमावर ट्रोलर्स ची टोळधाड आली होती. तेव्हा या टीका सहन न करता मृण्मयीने जशास तसे उत्तर दिले.

हेही वाचा: '२६/११ च्या त्या भयंकर रात्री मी..' मृण्मयी देशपांडेचा थरारक किस्सा..

नुकतंच होऊन गेलेलं झी मराठी वरील सारेगमप लिटल चॅम्पसचं नवीन पर्व चांगलंच गाजलं. या पर्वात परीक्षक पदी आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड हे पहिल्या पर्वातील पंचरत्न विराजमान झाले होते. तर मृण्मयी सूत्रसंचालन करत होती. यावेळी मृण्मयी सह या पाचही जणांना खूप ट्रॉल केले गेले. त्यांच्यावर अनेक मिम्स आणि टीका करण्यात आल्या. 'ओव्हर अॅक्टींग कमी करा हो' अशी टीका एकाने केली होती तर 'समोर असलेले जज आणि अँकर खूप ओरडतात याला ओव्हर अॅक्टींग म्हणायची का?' असेही म्हंटले होते.

या टीकेला मृण्मयीने देखील उत्तर दिले, 'तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? शांत बसला असतात का, हाताची घडी घालून.' असा सडेतोड फटका मृणमयीने ही लगावला. या प्रकाराविषयी बोलताना मृण्मयी म्हणाली होती, 'आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय' तिचे हे विधान प्रचंड व्हायरल झाले होते. तेव्हापासून मृण्मयीवर भाष्य करताना ट्रोलर्स विचार करून विधान करतात.

Web Title: Mrunmayee Deshpande Birthday Story She Answered To Trollers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top