महाराष्ट्राचा इतिहास रुपेरी पडद्यावर येणं आवश्‍यक! : रोहित शेट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 20 February 2020

"गोलमाल', "सिंघम', "सिंबा यांसारखे मनोरंजनात्मक चित्रपट बनवणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी आता कलर्स हिंदी वाहिनीवरील "खतरों के खिलाडी' या शोचे सूत्रसंचालन करीत आहे.

मुंबई : महाराष्ट्राला शूरवीरांचा मोठा इतिहास लाभला आहे. त्याच इतिहासातील सोनेरी पान म्हणजे सरदार तानाजी मालुसरे. त्यांच्याच जीवनावर आधारीत "तान्हाजी... द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने तीनशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला ही नक्कीच आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रातील अशा शूरवीरांचा इतिहास रुपेरी पडद्यावर येणे आवश्‍यक आहे, असे उद्‌गार प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी काढले.

कमल हासनच्या शूटींगदरम्यान अपघात; तिघांचा मृत्यू

"गोलमाल', "सिंघम', "सिंबा यांसारखे मनोरंजनात्मक चित्रपट बनवणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी आता कलर्स हिंदी वाहिनीवरील "खतरों के खिलाडी' या शोचे सूत्रसंचालन करीत आहे. येत्या शनिवारी शोला सुरुवात होईल. यानिमित्त त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, "तान्हाजी' चित्रपटासाठी सगळ्या टीमने मेहनत घेतली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले. चित्रपटाने चांगला व्यवसाय केला ही आनंदाची बाब आहे. खरे तर महाराष्ट्रातील अशाच शूरवीरांवर चित्रपट निघणे आवश्‍यक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक जागा वा वास्तू आहेत. त्यांचे दर्शनही चित्रपटात होणे आवश्‍यक आहे. येथील इतिहास आजच्या पिढीला समजावा आणि त्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी याकरिता ऐतिहासिक चित्रपट बनवणे आवश्‍यक आहे.
"खतरों के खिलाडी' या शोबद्दल सांगताना शेट्टी म्हणाले, "मागील सीझनपेक्षा हे सीझन आकर्षक आणि रोमहर्षक आहे. बल्गेरिया येथे शोचे चित्रीकरण झालेले आहे. प्रत्येक वेळी आमच्यासमोर एक नवीन आव्हान असते. या वेळी स्पर्धकांनी विविध चित्तथरारक स्टंट केले आहेत.'
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Shetty speaks about Maharashtra s History