SS Rajamouli: इंग्रजांना 'व्हिलन' दाखवलं, राजामौली गोत्यात! सापडले वादात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SS Rajaumauli

SS Rajamouli: इंग्रजांना 'व्हिलन' दाखवलं, राजामौली गोत्यात! सापडले वादात

SS Rajamouli Movie RRR Controversy: भारतातील सर्वात प्रभावी दिग्दर्शक म्हणून आता एस एस राजामौलींच्या नावाचा उल्लेख केला जातो आहे. मख्खी, बाहुबली आणि आता आरआरआर सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. त्यांच्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश संपादन केलं आहे. आरआऱआनं तर चारशे कोटींहून अधिक कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला आहे. राजामौली हे भव्य दिव्य निर्मितीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. सध्या ते वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले आहे.

राजामौली यांच्या आरआरआर या बहुचर्चित चित्रपटामध्ये इंग्रजांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशी टीका काहींनी केली आहे. याचा मोठा फटका आरआरआरला बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सध्या राजामौली यांचा आरआरआर हा ऑस्करच्या शर्यतीत आहे. त्यातील रामचरणला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचं नामांकनही मिळालं आहे. अशा परिस्थितीत नव्यानं सुरु झालेला वाद हा वातावरण दुषित करु शकतो असे राजामौली यांना वाटते. म्हणून त्यांनी आपली बाजु मांडली आहे.

आरआरआर हा आता ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. एका आदिवासी समाजातील लोकांवर इंग्रजांनी केलेला अन्याय, अत्याचार आणि त्याच्याविरोधात एकानं केलेलं बंड, इंग्रजांना शिकवलेला धडा अशी साधारण त्या कथेची रुपरेषा आहे. चित्रपटाच्या वेळी असा कोणताही वाद समोर आला नव्हता. मात्र आता इंग्रजांना खलनायक ठरवणं वादाच्या भोवऱ्यात आलं आहे.

हेही वाचा: Kate Winslet Update: टायटॅनिकच्या 'रोझ'च्या प्रकृतीत सुधारणा!

राजामौली यांनी यावरुन आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, चित्रपट जेव्हा सुरु होतो तेव्हा एक निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, हा कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक चित्रपट आहे असा दावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे लोकांना सामान्यपणे लक्षात येते की, कोणाला हिरो दाखवण्यात आले आहे आणि कुणाला खलनायक, आपण काही सगळ्याच ब्रिटिशांना खलनायक दाखवलेलं नाही. असं राजामौली यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: Emran Hashmi : सलमानशी घेतलाय पंगा, जीममध्ये सुरुय कसरत!

Web Title: Rrr Movie Director Ss Rajamauli British Villan Negative Role Trending Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..