RRR: 'गांधी - नेहरुंमुळे काश्मीर अजुन जळतोय!' राजामौलींच्या वडिलांचं वक्तव्य

टॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आर आर राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली.
rrr movie news
rrr movie newsesakal

RRR Movie: टॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आर आर राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. त्याच्या झंझावातापुढे बॉलीवूडच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलले होते. आता आरआरआर हा (RRR Actor ramcharan and jr ntr) एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण असे की, या चित्रपटाच्या शेवटी एका गाण्यात देशातील वेगवेगळ्या महान व्यक्तिमत्वांना अभिवादन करण्यात आले आहे. मात्र त्यात महात्मा गांधी आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा नामोल्लेख नाही. (tollywood news) त्यावरुन राजामौली यांना देखील विचारणा झाली होती. त्यावर त्यांच्या वडिलांनी के व्ही विजयेंद्र यांनी धक्कादायक उत्तर दिले आहे.

रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या जबरदस्त अभिनयानं प्रेक्षकांची पसंती (Entertainment news) मिळवली होती. त्या चित्रपटाला केवळ भारतातच नाहीतर जगभरात मोठा प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाच्या शेवटी शोले नावाचे गाणे आहेत. त्यात आलिया, रामचरण आणि एनटीआर हे देशातील वेगवेगळ्या मान्यवरांना आदरांजली वाहताना दिसतात. मात्र त्यात देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल यांचा नामोल्लेख नसल्यानं नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

केव्ही विजयेंद्र यांनी आरआरआरचे लेखन केले आहे. आता त्यांनी जे कुणी शोले गाण्यावरुन प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. ते काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत. विजयेंद्र यांचे म्हणणे आहे की, गांधी आणि नेहरु यांच्यामुळे अजुनही काश्मीर जळतो आहे. हे आपण विसरता कामा नये. शोले गाण्यामध्ये गांधी आणि नेहरु यांना का वगळण्यात आले असा प्रश्न दिग्दर्शक आणि लेखकाला विचारण्यात आला होता.

rrr movie news
'RRR 'गे' सिनेमा?'; परदेशात रंगली चर्चा, राम गोपाल वर्मानं आगीत ओतलं तेल

25 मार्च 2022 रोजी आरआरआर हा देशभरात प्रदर्शित झाला होता. त्याला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. वास्तविक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरुन कोणत्याही प्रकारचा वाद समोर आलेला नव्हता. आता उपस्थित झालेल्या प्रश्नानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com