esakal | 'आरआरआर'च्या 'दोस्ती'ची उत्सुकता,1 ऑगस्टला थीम साँग होणार रिलिज!
sakal

बोलून बातमी शोधा

rrr movie theme song

'आरआरआर'च्या 'दोस्ती'ची उत्सुकता,1 ऑगस्टला थीम साँग होणार रिलिज!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ज्या चित्रपटाची प्रेक्षकांना गेल्या काही महिन्यांपासून उत्सुकता आहे त्या चित्रपटातील एका गाणं आता प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर त्यासंबंधीची पोस्ट देखील व्हायरल झाली आहे. एसएस राजामौली यांचा दिग्दर्शक म्हणून 'आरआरआर' (RRR movie) बहुप्रतिक्षित पॅन-इंडिया चित्रपट आहे. चित्रपटाचे'दोस्ती' हे थीम साँग 1 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. (rrr movie theme song released on 1 august post viral on social media yst88)

निर्मात्यांनी या चित्रपटाच्या टायटल सॉंगबाबत खुलासा केला की, या चित्रपटाच्या टाइटल सॉन्गसाठी भारतातील सर्वोत्तम गायकांना एकत्र आणण्यात येणार आहे. ज्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भारताचे सर्वात मोठे म्यूजिक लेबल - भूषण कुमार यांची टी-सीरीज आणि लहरी म्यूझिकला आता या मैग्नम ओपस आरआरआरच्या म्युझिकचे वितरण करणार आहे. 'आरआरआर' भारतातील सर्वात भव्य दिव्य फिल्म असून यामध्ये सर्व भाषांमधली स्टारकास्ट समाविष्ट आहे. डीवीवी दानय्या द्वारा डीवीवी एंटरटेनमेंट बॅनर निर्मित, या चित्रपटाची निर्मिती 450 करोड रुपयांच्या मोठ्या बजेटवर करण्यात आली आहे.

स्वतंत्रता पूर्व भारतातील पार्श्वभूमीवर, हा चित्रपट प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी, कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामराजू यांच्या तरुणपणातील आयुष्यावर एक काल्पनिक कहाणी आहे. एक ब्लॉकबस्टर, चित्रपटाचे निर्माता पोस्टर आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'आरआरआर'च्या जगाच्या झलकेने जिज्ञासूंची उत्सुकता ताणण्यात यशस्वी झाला असून हा चित्रपट तितकाच भव्य दिव्य असून एक मोठा ब्लॉकबस्टर असणार आहे, हे आश्वासित करण्यात देखील यशस्वी झाला आहे.

हेही वाचा: माफी मागा, 25 कोटींची भरपाई द्या; शिल्पाची माध्यमांविरोधात याचिका

हेही वाचा: 'आता हा शेवट आहे', प्रख्यात दिग्दर्शक अनुराग असं का म्हटला?

पेन स्टूडियोजने पूर्ण उत्तर भारतातील नाट्य वितरण अधिकार मिळवले असून सर्व भाषांमधील विश्वव्यापी इलेक्ट्रॉनिक अधिकार देखील विकत घेतले आहेत. पेन मरुधर या चित्रपटाला नॉर्थ टेरिटरीमध्ये वितरित करणार आहेत. हा चित्रपट तेलुगु, हिंदी, तमिळ, मलयाळम आणि कन्नड यांच्यासाहित अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. कोविड परिस्थिती लक्षात घेऊन 'आरआरआर' जगभरात 13 ऑक्टोबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे.

loading image
go to top