'फ्रेंडशिप डे'ला RRR ची 'दोस्ती' व्हायरल, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव

फ्रेंडशिप डे (friendship day) च्या निमित्तानं आरआरआरच्या (RRR movie) निर्मात्यांनी एक खास गाणं चाहत्यांसाठी प्रदर्शित केलं आहे.
rrr movie
rrr movie team esakal

मुंबई - फ्रेंडशिप डे (friendship day) च्या निमित्तानं आरआरआरच्या (RRR movie) निर्मात्यांनी एक खास गाणं चाहत्यांसाठी प्रदर्शित केलं आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरआरआरच्या नावाची चर्चा आहे. त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेवरुनही गोंधळ झाला होता. आता तो दिवाळीमध्ये (Diwali) प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. यापूर्वी त्याच्या टीझर आणि ट्रेलरलाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून बाहुबलीचे नाव घेतले जाते. त्याचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. (rrr song dosti released jr ntr and ram charan dosti music video viral yst88)

आता फ्रेंडशिप डे च्या निमित्तानं निर्मात्यांनी प्रेक्षकांना आगळीवेगळी पर्वणी दिली आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे. आर आर आर मधील त्या गाण्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोस्ती(dosti song viral) नावानं हे गाणं प्रदर्शित झालं आहे. त्याला आतापर्यत साडेचार लाख व्ह्युजही मिळाले आहेत. त्या गाण्यामध्ये ज्युनियर एनटीआर (Jr NTR), राम चरण (Ram Charan) यांच्या मैत्रीचं कौतूक करण्यात आलं आहे. 'आरआरआर' चं (RRR) हे पहिलं गाणं आहे. त्याला चाहत्यांची वाहवा मिळाली आहे. या चित्रपटात एनटीआर आणि रामचरण हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्या मैत्रीची एक अनोखी गोष्ट आजच्या खास दिवसाच्या औचित्यानं मांडण्याचा प्रयत्न या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

rrr movie
उमेश - प्रियाचं 'बचपन का प्यार' चर्चेत, व्हिडिओ व्हायरल
rrr movie
'पुरुषाच्या चूकीवर बाईला दोष देणं बंद करा'

दोन स्वातंत्र्यसैनिकांवरती या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक बजेट असणारा हा चित्रपट आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याची चर्चा आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे शुटिंग लांबणीवर पडले होते. त्यामुळे त्याचे प्रदर्शन लांबल्यानं प्रेक्षकांची निराशा झाली होती. दोस्ती या गाण्याला संगीतकार अमित त्रिवेदीनं गायलं आहे. तर रिया मुखर्जीनं हे गाणं लिहिलं आहे.

निर्मात्यांनी यापूर्वी असं सांगितलं होतं की, या गाण्याच्या माध्यमातून ते भारतातील सर्व आघाडीच्या गायकांना एकत्र आणणार होते. हे गाणं म्हणजे एक आगळा वेगळा अनुभव असल्याचे निर्मांत्यांनी सांगितले आहे. आरआरआर ही पिरीयड ड्रामा मुव्ही आहे. जो स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम आणि अल्लुरी सीताराम राजु यांच्यावर आधारित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com