हृतिकचे फिटनेस रेजीम 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

"कहो ना प्यार है' हृतिक रोशनचा पहिलावहिला सिनेमा. या सिनेमातील त्याचं नृत्यकौशल्य आणि शरीरयष्टी यावर अनेक मुली फिदा होत्या. तेव्हापासून आतापर्यंत हृतिक रोशनची बॉडी हा बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि आता तर प्रत्येकालाच त्याच्यासारखी शरीरयष्टी कमावण्याची संधी मिळणार आहे. हृतिक रोशन आपलं फिटनेस रेजीम लॉंच करण्याच्या तयारीत आहे. हे रेजीम स्वतः हृतिक फॉलो करतो. त्याचे नाव "द एचआरएक्‍स वर्कआऊट' असं असणार आहे. हृतिक रोशन आपला फिटनेस ट्रेनर मुस्तफा अहमद याच्याबरोबर मिळून हे रेजीम लॉंच करतोय. हृतिक आणि मुस्तफा मिळून इतर ट्रेनर्सना ट्रेनिंग देणार आहेत.

"कहो ना प्यार है' हृतिक रोशनचा पहिलावहिला सिनेमा. या सिनेमातील त्याचं नृत्यकौशल्य आणि शरीरयष्टी यावर अनेक मुली फिदा होत्या. तेव्हापासून आतापर्यंत हृतिक रोशनची बॉडी हा बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि आता तर प्रत्येकालाच त्याच्यासारखी शरीरयष्टी कमावण्याची संधी मिळणार आहे. हृतिक रोशन आपलं फिटनेस रेजीम लॉंच करण्याच्या तयारीत आहे. हे रेजीम स्वतः हृतिक फॉलो करतो. त्याचे नाव "द एचआरएक्‍स वर्कआऊट' असं असणार आहे. हृतिक रोशन आपला फिटनेस ट्रेनर मुस्तफा अहमद याच्याबरोबर मिळून हे रेजीम लॉंच करतोय. हृतिक आणि मुस्तफा मिळून इतर ट्रेनर्सना ट्रेनिंग देणार आहेत. जेणेकरून त्यामध्ये कोणतीही चूक होऊ नये. काही ठराविक जिममध्येही हे रेजीम आणणार आहेत. पुढील महिन्यात हे रेजीम सगळ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. हृतिक रोशन याबाबतीत म्हणाला, "एचआरएक्‍स' लॉंच करण्याचा मुख्य हेतू हा होता की, प्रत्येकाने स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. सध्या स्वतःची तब्येत आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याची फार गरज आहे. मी हे रेजीम जास्तीत जास्त लोक तंदुरुस्त व्हावेत म्हणून लॉंच करतोय.' 

Web Title: ruhtik roshan fitness