'तारक मेहता...' मधील अभिनेत्याच्या निधनाची अफवा; अखेर सत्य समोर आलं

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Mandar Chandwadkar (Tarak Mehta Ka ooltah chashmah)
Mandar Chandwadkar (Tarak Mehta Ka ooltah chashmah)Google

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta ka Ooltah chashmah) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता आत्माराम भिडे उर्फ मंदार चंदवाडकरच्या निधनाच्या बातमीविषयी मोठी अफवा पसरली होती. या अफवांना ऐकल्यानंतर आता मंदार चंदवाडकरनं(Mandar Chandwadkar) समोर येऊन याविषयी स्वतः खुलासा केला आहे आणि सोशल मीडियावर पसरलेल्या या अफवेला खोटं ठरवलं आहे.

Mandar Chandwadkar (Tarak Mehta Ka ooltah chashmah)
अनुष्काची घर-करिअर सांभाळताना दमछाक; म्हणाली,'एका आईच्या अडचणी समजून घ्या'

१७ मे रोजी मंदार चंदवाडकरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलंय,''मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवू नका. तुम्हाला मी हात जोडून नमस्कार करतो. कसे आहात आपण सगळे? कसं सुरु आहे तुमचं काम? मी पण कामावर आहे. काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीनं मला एक बातमी पाठवली,जी माझ्याच निधनाची होती. मला वाटलं,की अशा खोट्या अफवा पसरायला नकोत. म्हणून मी लाइव्ह येऊन तुमच्याशी यावर बोलणं योग्य समजलो. आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी ठणठणीत आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीच्या खोट्या अफवा पसरवू नका''.

याआधी अनेक कलाकारांच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरल्या आहेत. त्यात दिव्यांका त्रिपाठी,मुकेश खन्ना,शिवाजी साटम,श्वेता तिवारी अशा अनेकांची नावं घेता येतील. सोशल मीडियावर वेगानं या अशा अफवा पसरतात. प्रत्येक सेलिब्रिटींनी अशावेळी आपल्या निधनाच्या खोट्या अफवा पसरल्यानंतर समोर येऊन त्या बातम्यांना खोटं ठरवलं होतं.

Mandar Chandwadkar (Tarak Mehta Ka ooltah chashmah)
Plastic surgery नंतर कन्नड अभिनेत्रीचा खाजगी रुग्णालयात मृत्यू

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. मालिकेतील मुख्य आणि दमदार भूमिका साकारणारे शैलेश लोढा मालिका सोडणार असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मेकर्स आणि शैलेश लोढा यांच्यात शूटिंगच्या डेट्स तारखांवरुन वाद सुरु आहे. त्यांनी मालिकेचं शूटिंगही थांबवलं असल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com