'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीचा ऑडिशनचा व्हिडीओ पाहिलात का?

टेलिव्हिजनवर सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका
Rupali Ganguly
Rupali Ganguly

सध्या हिंदी मालिकांमध्ये टीआरपीच्या यादीत अग्रेसर असलेली मालिका म्हणजे 'अनुपमा' Anupamaa. या मालिकेत एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली Rupali Ganguly हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेचा आणि अभिनेत्री रुपालीचा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 'अनुपमा' मालिकेच्या एका फॅनपेजवर रुपालीच्या ऑडिशनचा व्हिडीओ नुकताच पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Rupali Ganguly audition video for Anupamaa goes viral Watch video)

या व्हिडीओमध्ये रुपाली ऑडिशन देताना दिसत आहे. व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये रुपालीचा पती अश्विन के वर्मा यांनी कमेंट करत ती क्लिप मालिकेच्या ऑडिशनचीच असल्याचं म्हटलंय. एक आदर्श पत्नी, सून आणि आई बनण्याआधी अनुपमाची सुरू असलेली धडपड या मालिकेत दाखवण्यात आली आहे. रुपालीच्या या ऑडिशन व्हिडीओला ७० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Rupali Ganguly
'ये रिश्ता..' फेम अभिनेता करण मेहराला अटक; पत्नीकडून मारहाणीचे आरोप
Rupali Ganguly
'अलका कुबल बनून राहशील तर कोणी ढुंकून पाहणार नाही'; ट्रोलर्सना जुईचं सडेतोड उत्तर

या मालिकेत रुपाली गांगुलीसोबतच सुधांशू पांडे, मदालसा शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. स्टार प्लस वाहिनीवर गेल्या वर्षी ही मालिका सुरू झाली असून टीआरपीच्या यादीत ही मालिका अग्रेसर असते. सध्या महाराष्ट्रातील लॉकडाउनमुळे या मालिकेचं शूटिंग गुजरातमध्ये सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com