
Lady Gaga : 'युक्रेनच्या नागरिकांची चिंता, देवाकडे रोज प्रार्थना'
Ukrain Russia War: रशिया आणि युक्रेनच्या युद्धानं आता मोठे प्रश्न जगासमोर निर्माण केले आहेत. तेलाचा आणि नॅचरल गॅसचा प्रश्न हा (Russia Ukraine War 2022) सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या युद्धावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामध्ये मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. (Hollywood News) मनुष्यहानीचा अधिकृत आकडा अजून समोर आलेला नाही. मात्र या युद्धामध्ये युक्रेननं शांततेची भूमिका घेतली आहे. त्यांना जगातील वेगवेगळ्या देशांनी पाठींबा दर्शवला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड, हॉलीवूड सेलिब्रेटींनी युक्रेनप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. (Lady Gaga Supports Ukrain)
दोन दिवसांपूर्वी अमेरिकन अभिनेत्रीनं कविता करुन रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यावर टीका केली होती. आता प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री लेडी गागानं पुतीन यांच्यावर नाराजी व्यक्त करताना युक्रेनच्या नागरिकांच्याप्रती सहानुभूती दाखवली आहे. युक्रेननं भलेही रशियाला जशास तसे उत्तर दिले नसले तरी त्यांनी अजून हार मानलेली नाही. यासगळ्यावर लेडी गागा म्हणते, जे काही चालले आहे ते चूकीचे आहे. या युद्धानं काय साध्य होणार आहे हे माहिती नाही. मात्र यासगळ्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो आहे. त्याच्या जीवनमानावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यकर्ते हे लोकांच्या बाजूनं विचार करत नसल्याचे या युद्धाच्या निमित्तानं दिसून आले आहे. त्या लोकांनी हे सगळं का सहन करायचे.
मी देवाकडे सारखी प्रार्थना करत आहे की, युक्रेनच्या लोकांना सुखात ठेव. त्यांची काळजी घे. आता सगळ्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. जे काही चालले आहे त्यासगळ्यात दोन्ही राष्ट्रांचे नुकसानच आहे. मात्र काहीजण आपल्या स्वार्थासाठी नको त्या गोष्टींना महत्व देत आहेत. Sag Awards 2022 कार्यक्रमामध्ये लेडी गागाला बोलवण्यात आले होते. त्यावेळी तिनं रशिया युक्रेन युद्धावर परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. मी जेव्हा या कार्यक्रमामध्ये आले तेव्हा मला फार बरे वाटले. याठिकाणी मला माझी भूमिका मांडता आली हेही मला समाधानकारक असेच आहे. आम्ही केवळ कलाकार राहता कामा नये. आपल्याला एक भूमिकाही घेता यायला हवी. असेही लेडी गागानं यावेळी सांगितलं.